बाप्पांच्या विसर्जनाची तयारी जोरात; पालिका सज्ज, यंदा गणेशोत्सवाचं नियोजन कसं असेल?

पुणेकरांच्या लाडक्सा बाप्पांच्या स्वागतासाठी गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. तसेच बाजारपेठाही आता सजल्या आहेत. तसेच नागरिकांनी गणेशोत्सवाची तयारीदेखील सुरू केली आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेनेदेखील यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, आनंदात तसेच स्वच्छतेसह चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 6 Sep 2023
  • 02:55 pm
Ganeshotsav 2023

यंदाच्या गणेशोत्सवात मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कंटेनर, लोखंडी टाक्यांची संख्या वाढविणार

पुणेकरांच्या लाडक्सा बाप्पांच्या स्वागतासाठी गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. तसेच बाजारपेठाही आता सजल्या आहेत. तसेच नागरिकांनी गणेशोत्सवाची तयारीदेखील सुरू केली आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेनेदेखील यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, आनंदात तसेच स्वच्छतेसह चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. महापालिकेकडून मूर्ती संकलन केंद्र आणि विसर्जन हौद, निर्माल्य कंटेनर, लोखंडी टाक्यांची सुविधा पुरवली जाणार असून मागच्या वर्षीपेक्षा यंदा त्यात वाढ केली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी विविध विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या. त्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्सवाच्या काळात शहरात स्वच्छता ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. त्याप्रमाणे घनकचरा विभागाला आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सवात जलप्रदूषण होऊ नये, नदीत निर्माल्य टाकू नये यासाठी पालिकेकडून काळजी घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी हौद, लोखंडी टाक्‍या, मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य कंटेनर यांची सुविधा वाढविण्यात आली आहे. महापालिकेकडून गणेशोत्सवात पूर्ण सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.  

निर्माल्य पाण्यात नको कंटेनरमध्ये टाका

गणेशाच्या पूजेसाठी वापरण्यात आलेले साहित्य, नारळ, पुष्पहार तसेच दैनंदिन पूजा, धार्मिक विधींमुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. सवयीप्रमाणे नागरिक गणपतीचे विसर्जन करताना ते निर्माल्य थेट नदीच्या पाण्यात टाकतात. परंतु पालिकेने निर्माल्य पाण्यात टाकण्यास मनाई केली आहे. त्यासाठी गणेशोत्सवात निर्माल्य टाकण्यासाठी कंटेनरच्या संख्येत मागच्या वर्षीपेक्षा यंदा वाढ केली आहे.

मूर्ती संकलन करणाऱ्या ठिकाणांची संख्या...

केंद्र कसबा : विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३९

हडपसर : मुंढवाः ३६

सिंहगड रस्ता : २५,

कोथरूड : बावधन व धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी १९,

औंध बाणेर येथे १७

शिवाजीनगर घोले रस्ता १६

क्षेत्रीय कार्यालय : कंटेनरची संख्या

हडपसर : मुंढवा : ३६,

सिंहगड रोड : ३४, वारजे : कर्वेनगर : २४,

धनकवडी : सहकारनगर :२०

कोथरूड : बावधन व बिबवेवाडी : प्रत्येकी १९

कसबा : विश्रामबाग : १५

औंध : बाणेर व येरवडा : कळसः धानोरी येथे प्रत्येकी १४

ढोले पाटील रस्ता : १३

कोंढवा : येवलेवाडी १३

शिवाजीनगर घोले रस्ता : १२

लोखंडी टाक्यांची संख्या...

धनकवडी : सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय : ७७

वारजे : कर्वेनगर ७१

कोथरूड : बावधन ६७

कोंढवा येवलेवाडी ५८

कसबा : विश्रामबाग ५७

बिबवेवाडी ५४

हौदांची व्यवस्था...
वारजे - कर्वेनगर येथे ८ हौद असतील, शिवाजीनगर घोले रस्ता, धनकवडी सहकारनगर व कोंढवा येवलेवाडी येथे प्रत्येकी ६, भवानी पेठ, ढोले पाटील रोड व येरवडा - कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी ३ हौदांची व्यवस्था असणार आहे.

महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी क्षेत्रीय कार्यालयानुसार व्यवस्था करण्यात येत आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा गणेशोत्सवात निर्माल्य कंटेनर, लोखंडी टाक्‍या, मूर्ती संकलन केंद्र वाढविले आहेत.

- आशा राऊत, घनकचरा विभाग प्रमुख, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest