कान तोडणारा रिक्षाचालक अटकेत, भाड्यावरून भांडण बेतले भाडेकरूच्या कानावर, आरोपी सराईत गुन्हेगार

प्रवासी भाड्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका प्रवाशाला लाथाबुक्यांनी मारहाण करत दाताने चावा घत कान तोडणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 10 Jun 2023
  • 12:21 am
कान तोडणारा रिक्षाचालक अटकेत, भाड्यावरून भांडण बेतले भाडेकरूच्या कानावर, आरोपी सराईत गुन्हेगार

कान तोडणारा रिक्षाचालक अटकेत, भाड्यावरून भांडण बेतले भाडेकरूच्या कानावर, आरोपी सराईत गुन्हेगार

भाड्यावरून भांडण बेतले भाडेकरूच्या कानावर, आरोपी सराईत गुन्हेगार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

प्रवासी भाड्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका प्रवाशाला लाथाबुक्यांनी मारहाण करत दाताने चावा घत कान तोडणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रवाशाला १ जून रोजी मारहाण करून पळून गेलेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी स्वारगेट एसटी स्टॅंड परिसरातून पळून जाताना गुरुवारी (दि. ८) रात्री ताब्यात घेतले.

प्रवाशाला मारहाण करून त्याचा कान तोडण्याची ही धक्कादायक घटना गुरुवारी १ जून रोजी पहाटे एकच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकाजवळील सातारा रोड परिसरात असलेल्या रिक्षा थांब्याजवळ घडली होती. संतोष चव्हाण (वय ४१, रा. अलिबाग रायगड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून रिक्षाचालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

फिर्यादी हे त्यांच्या गावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे रिक्षाने आले होते. त्यावेळी त्यांचा रिक्षाचालकाबरोबर वाद झाला. रिक्षाचालक आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. यानंतर आरोपी पळून गेले होते. यातील मुख्य आरोपी हा सराईत असून तो बारामती येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी जाऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून खात्री केली. त्यावेळी आरोपी हा तेथून पुण्याला गेल्याचे समजले.

पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यावर त्यांना आरोपी हा स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये येणार असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. सापळा लावून पोलीस पथक थांबले असता आरोपी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरात दिसला. त्याचा पाठलाग करून ताब्यात घेत नाव विचारले असता त्याने आदेश संजय काळे (वय ३९, रा. पर्वती दर्शन, पुणे) अशी माहिती दिली. त्यासोबतच त्याने गुन्हा केल्याची कबुलीही दिली.  

आरोपी आदेश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचे तीन आणि इतर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी चाचे करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest