पुणे: तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत!

पुणे: गेले तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या मुख्यमंत्र्यांच्या  जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Sat, 20 Jul 2024
  • 04:15 pm
Dnyaneshwar Tambe, Bharat Tambe, CM Eknath Shinde, Advertisement

पुणे: तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत!

कुटुंबीयांनी केली वडिलांचे दर्शन घडवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे: गेले तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या मुख्यमंत्र्यांच्या  जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते. त्यांचा कुटुंबाने सर्वत्र  शोध घेतला परंतु तांबे कुटुंबियांना ज्ञानेश्वर तांबे  मिळून आले नाही. अखेरीस तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबाला धक्काच बसला आहे.  

याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की, आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते. आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु ते सापडत नव्हते. आता  त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे. त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे ही विनंती केली आहे.

Share this story

Latest