तळवडेतील आगीत झालेल्या कामगारांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी, फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
तळवडे एमआयडीसीमधील ज्योतीबानगर येथे वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्यांच्या कंपनीत आग लागून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ महिला जखमी झाल्या असून त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. या घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून मृतांना श्रंद्धांजली वाहिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी तळवडेतील कंपनीत झालेल्या आगीबाबत त्यांच्या एक्स हँडलवरून ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना देखील केली आहे. फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे ‘फायर कँडल’ तयार करणार्या एका कारखान्याला आग लागून 6 महिलांचे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.”
पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे ‘फायर कँडल’ तयार करणार्या एका कारखान्याला आग लागून 6 महिलांचे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2023
या घटनेत 8 जखमी असून, त्यातील 5 गंभीर आहेत. जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या…
“या घटनेत 8 जखमी असून, त्यातील 5 गंभीर आहेत. जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचाराची काळजी घेतली जात आहे. पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती सर्व मदत दिली आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आहेत. तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कारखान्यात जवळपास २० ते २५ कामगार काम करत होते. मात्र दुपारच्या सुमारात आग लागली आणि कामगारांनी आरडा ओरड सुरु करत या कारखान्यातून बाहेर पडले. मात्र सात जण याच आगीतून स्वत:चा बचाव करण्यात अपयशी ठरले आणि त्यांचा होरपळून मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.