Advertisement

US-israel-iran war | माझ्याच सरकारमध्ये कोणीतरी खबऱ्या; वैमानिकाच्या बचाव मोहिमेची गुप्त माहिती फुटल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना संशय…

प्रसारमाध्यमांनाही दिला कडक इशारा

वॉशिंग्टन : इराणच्या भूमीवर कोसळलेल्या अमेरिकन ‘एफ-१५ इगल” विमानातील जखमी वैमानिकाला वाचवण्यात अमेरिकन सैन्याला यश आले आहे. या यशस्वी मोहिमेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला. आपल्याच प्रशासनातील कोणीतरी अज्ञात व्यक्ती शत्रूला संवेदनशील माहिती पुरवत असून, त्यामुळे या मोहिमेत वैमानिकाचा जीव धोक्यात आला होता, असा संशय ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांच्या मते, बचाव मोहिमेची अत्यंत गोपनीय माहिती बाहेर आल्यामुळे इराणच्या सैन्याला अमेरिकन वैमानिकाच्या अस्तित्वाची कुणकुण लागली होती. “माझ्या सरकारमध्येच कोणीतरी गुप्तहेर असण्याची शक्यता आहे. या माहितीच्या गळतीमुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले होते,” असे ट्रम्प यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनाही कडक इशारा दिला. ज्या पत्रकाराने ही गुप्त माहिती पहिल्यांदा प्रसिद्ध केली, त्याने आपले स्रोत उघड न केल्यास त्याला तुरुंगात जावे लागेल, अशी धमकीही त्यांनी दिली. या यशस्वी मोहिमेनंतर आता अमेरिकन प्रशासनातील ‘माहिती लीक’ करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान ट्रम्प सरकारसमोर उभे ठाकले आहे.

१५५ विमानांचा ताफा आणि ‘छद्मयुद्ध’

या मोहिमेच्या व्याप्तीबद्दल माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, केवळ एका सैनिकाला शत्रूच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने १५५ विमानांचा वापर केला. यामध्ये चार बॉम्बर, ६४ फायटर जेट्स, ४८ रिफ्युलिंग टँकर्स आणि १३ बचाव विमानांचा समावेश होता. इराणी सैन्याची दिशाभूल करण्यासाठी ‘छद्मयुद्ध’ तंत्राचा वापर करण्यात आला, जेणेकरून शत्रूला वैमानिकाच्या नेमक्या ठिकाणाचा अंदाज येऊ नये.

जखमी वैमानिकाचा थरारक संघर्ष

विमान कोसळल्यानंतर संबंधित अधिकारी गंभीर जखमी झाला होता. मात्र, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि रक्तबंबाळ अवस्थेतही त्याने डोंगराळ भाग पार केला. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने अमेरिकन सैन्याशी संपर्क साधून आपले अचूक लोकेशन कळवले. त्याच्या या असीम धैर्यामुळेच ही मोहीम यशस्वी होऊ शकली, असे ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

US-israel-iran war | इराणी नागरिक बलिदानास तयार; अमेरिकेला दिला २० तासांचा अल्टिमेटम...

Next Post

US-israel-iran war | होर्मुझमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर २० लाख डॉलर 'सुरक्षा कर'; इराणचा अमेरिकेसमोर १० कलमी प्रस्ताव...