Advertisement

US-israel-iran war | होर्मुझसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले पुन्हा ४८ तास, त्यानंतर इराणवर प्रलयासारखे कोसळेल संकट

सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म ट्रूथवर केली केली पोस्‍ट

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एकतर करार करण्यासाठी किंवा होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसे न केल्यास इराणवर “नरक कोसळेल”, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, इराणने दावा केला आहे की त्यांनी अमेरिकेचे लढाऊ विमान पाडण्यासाठी ‘नवीन’ संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म ट्रूथवर केलेले पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, मी इराणला ‘करार करण्यासाठी’ किंवा ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी’ दहा दिवसांची मुदत दिली होती? आता वेळ संपत आली आहे. ४८ तासांनंतर त्यांच्यावर प्रलयासारखे संकट कोसळेल.

इराणचा अमेरिकन लढाऊ विमान पाडल्याचा दावा

इराणच्या ‘खातम अल-अंबिया’ संयुक्त लष्करी कमांडने आज स्‍पष्‍ट केले की, शुक्रवारी अमेरिकेच्या एका लढाऊ विमानाला लक्ष्य करण्यासाठी “नवीन” हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केला. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे की, देश आपल्या हवाई क्षेत्रावर “निश्चितपणे पूर्ण नियंत्रण” मिळवेल.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, युद्धबंदी घडवून आणण्यासाठी इस्लामाबादचे प्रयत्न “योग्य मार्गावर” आहेत. मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये कोंडी निर्माण झाल्याच्या वृत्तानंतर प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी एपीशी बोलताना ही माहिती दिली.पाकिस्तानने गेल्या आठवड्यात तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या वरिष्ठ राजदूतांचे यजमानपद भूषवले होते. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, इराणने इस्लामाबादला जाण्यास कधीही नकार दिला नाही, परंतु सरकार या संघर्षाचा “निर्णायक आणि कायमस्वरूपी” अंत शोधत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी या विधानाचे स्वागत केले आहे.

इराणकडून इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला

इस्रायली सैन्याने इशारा दिला आहे की, इराणकडून पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांची लाट इस्रायलच्या दिशेने येत आहे. गेल्या दोन तासांतील हा दुसरा मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.

शैक्षणिक संस्थांना लक्ष्य केल्याचा इराणचा आरोप

इराणचे विज्ञान मंत्री हुसेन सिमाई सर्राफ यांनी दावा केला आहे की, अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षात देशातील ३० हून अधिक विद्यापीठांवर थेट हल्ले झाले आहेत. त्यांनी म्हटले की, “गैर-लष्करी ठिकाणे आणि शिक्षण व संशोधनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे, ज्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.”तेहरानमधील प्रतिष्ठित ‘शहीद बेहेश्टी विद्यापीठा’चेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इराणने या हल्ल्यांना देशाचा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न म्हटले आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

US-israel-iran war | अमेरिकेचे हॉलिवूड स्टाईल ऑपरेशन; हवाई दलाच्या कंमांडरला वाचवण्याची मोहिम यशस्वी...

Next Post

IND vs PAK | ...तर आम्ही कोलकातापर्यंत पोहोचू, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला धमकी...