कैद्यासोबतचे संबंध झाले उघड

दक्षिण पश्चिम लंडनमधील एचएमपी वँड्सवर्थ तुरुंगात एक हादरवणारी घटना घडली आहे. महिला तुरुंग अधिकाऱ्याचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

कैद्यासोबतचे संबंध झाले उघड

लंडन : दक्षिण पश्चिम लंडनमधील एचएमपी वँड्सवर्थ तुरुंगात एक हादरवणारी घटना घडली आहे. महिला तुरुंग अधिकाऱ्याचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिचे तुरुंगातील एका कैद्यासोबत संबंध आशयाचे उघड झाले आहे. ३० वर्षीय महिला अधिकाऱ्याचे नाव लिंडा डी सौसा अब्र्यू असे आहे. फुलहॅम, पश्चिम लंडन येथील ती रहिवासी आहे.

सार्वजनिक कार्यालयात असे कृत्य केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्या महिला अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची पाळी आली आहे. त्या महिला अधिकाऱ्याला उक्सब्रिज मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर राहणार आहे. जिथे तिच्यावरील प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

मागच्या आठवड्यात हा सेक्स व्हीडीओ समोर आल्यानंतर महानगर पोलिसांनी तपास सुरू केला. हा व्हीडीओ तुरुंगात शूट करण्यात आल्याचा आरोप आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यात ती महिला अधिकारी प्रथम पूर्ण गणवेशात दिसत आहे. यानंतर ती आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने या घटनेची माहिती देताना कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. व्हीडीओमध्ये दिसणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाशी संबंधित इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

व्हिक्टोरियन काळात १८५१ मध्ये एचएमपी वँड्सवर्थ तुरुंग बांधण्यात आले. या कारागृहाची अवस्था अत्यंत बिकट आहे. कारागृहात कैद्यांची संख्या जास्त असून ते जीर्ण झाले आहे. नुकतीच या कारागृहाची पाहणी करण्यात आली. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या. येथे अनेकदा हिंसक घटना घडल्याचे या पाहणीतून समोर आले. या कारागृहाच्या नुकत्याच झालेल्या तपासणीत अनेक त्रुटीही समोर आल्या आहेत. हे कारागृह अनेक कारणांमुळे वादात सापडले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest