संग्रहीत छायाचित्र
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची जबाबदारी स्वाकारल्यानंतर अनेक निर्णयांमध्ये बदल केला आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जोरदार पुनरागमन केले आहे. त्यांच्या काही निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी अवघ्या 6 तासांत 78 मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी जो बायडेन यांच्या अध्यक्षीय कार्यकाळतील काही महत्त्वाचे आदेश बलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प शपथविधीनंतर कॅपिटल वन एरिना येथे पोहोचले अनेक घोषणा केल्या.
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी पॅरिस क्लायमेट अॅग्रीमेंटमधून अमेरिका बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातदेखील हा निर्णय घेतला होता, परंतु बायडेन यांनी तो पलटवला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिकेचे सदस्यत्वही मागे घेतले. यामुळे संघटनेच्या फंडिंगवर परिणाम होईल असे तज्ञांनी म्हटले आहे. LGBTQ समुदायाशी संबंधित समानतेचे आदेशही रद्द करण्यात आले आहे. आता अमेरिकेत फक्त दोनच लिंग असणार फक्त स्त्री आणि पुरुष असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच कॅनडा आणि मेक्सिकोवर 1 फेब्रुवारीपासून 25 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी संघीय नोकरभरतीवर बंदी घातली असून, सर्व संघीय कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम बंद करून कार्यालयात काम करण्याचा आदेश दिला आहे. तसेच
ट्रम्प यांचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे परदेशी नागरिकांना जन्मत: मिळाणारे अमेरिकेचे नागरिकत्व ट्रम्प यांनी रद्द केले आहे. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होणार आहे.