अमेरिकेत छोट्या प्रवासी विमानाचा अपघात

एक अज्ञात विमान अचानक अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी या संवेदनशील भागात घिरट्या घालताना आढळले. त्यानंतर अमेरिकन संसद आणि राष्ट्रपती भवनाने या संदर्भात तातडीने सावधगिरीची सूचना जारी केली. त्यानंतर एफ-१६ विमानाने त्या विमानाचा पाठलाग केला अन् त्यानंतर त्या छोट्या विमानाचा अपघात झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 6 Jun 2023
  • 08:40 am
 Small passenger plane crash in America

अमेरिकेत छोट्या प्रवासी विमानाचा अपघात

राजधानीभोवती घिरट्या घालत असल्याने केला पाठलाग; विमान व्हर्जिनियाच्या जंगलात कोसळले

#वॉशिंग्टन

एक अज्ञात विमान अचानक अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी या संवेदनशील भागात घिरट्या घालताना आढळले. त्यानंतर अमेरिकन संसद आणि राष्ट्रपती भवनाने या संदर्भात तातडीने सावधगिरीची सूचना जारी केली. त्यानंतर एफ-१६ विमानाने त्या विमानाचा पाठलाग केला अन् त्यानंतर त्या छोट्या विमानाचा अपघात झाला.

रविवारी (४ जून) अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीवर अज्ञात विमान उडताना दिसले.  संवेदनशील परिसरात अचानकपणे विमान आल्याने वायुसेनेच्या एफ-१६ विमानाने उड्डाण घेऊन त्याचा पाठलाग केला. लढाऊ विमानाने या छोट्या विमानाच्या वैमानिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र विमानातून कुठलेच उत्तर मिळाले नाही. शेवटी ते अज्ञात विमान वॉशिंग्टन डीसीच्या जवळ असलेल्या व्हर्जिनियाच्या जंगलामध्ये कोसळले. अमेरिकेच्या वायुसेनेने याबद्दल खुलासा करत आम्ही विमानावर निशाणा साधला नसल्याचे म्हटले आहे. यूएस नॉर्थ अमेरिकन डिफेन्स कमांडने सांगितले की, एफ-१६ जेटने या विमानाच्या वैमानिकाचे लक्ष विचलित करण्यासाठी आगीचे लोट सोडले. परंतु सगळे प्रयत्न निरर्थक झाले. अज्ञात विमानाला अपघात झाला तेव्हा त्यात चार जण प्रवास करत होते. त्यांच्याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. व्हर्जिनिया प्रांताचे पोलीस या संबंधीचा तपास करीत आहेत. रात्री उशीर झाल्याने तपास थांबवण्यात आला होता. सोमवारी सकाळी पुन्हा तपास सुरू झाला आहे. तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, हे विमान फ्लोरिडा येथील एनकोर मोटर्स ऑफ मेलबर्न या कंपनीचे होते. कंपनीचे प्रमुख बार्बरा रुपमेल यांचे पती जॉन रुपमेल यांनी सांगितले की, त्यांची मुलगी, नात आणि आया या विमानाने प्रवास करत होते.  हे सर्वजण न्यू यॉर्कमधील ईस्ट हॅम्पटन येथून नॉर्थ कॅरोलिना येथील त्यांच्या घरी जात होते. दरम्यान अपघातस्थळी यांच्यापैकी कोणाचेच मृतदेह सापडलेले नाहीत.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest