संग्रहित छायाचित्र
पॅरिस : ची मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रेवेना हॅनीलीने तिचे व्हर्जिनिटी परत मिळवण्यासाठी विशेष शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. २३ वर्षीय रेवेनाने व्हर्जिनिटी मिळवण्यासाठी हायमेनोप्लास्टी करण्याची योजना आखली आहे. या शस्त्रक्रियेसाठी जवळपास १९ हजार डॉलर म्हणजेच १६ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.
रेवेना हॅनेली ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसह एक प्रसिद्ध मॉडेल आहे, जिचे इन्स्टाग्रामवर २ लाख ६६ पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना रेवेनाने व्हर्जिनिटी परत मिळवण्यासाठी हायमेनोप्लास्टी करून घेणार असल्याची माहिती दिली. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी एक नवीन सुरुवात म्हणून तिने हा निर्णय घेतला आहे. रेवेना म्हणाली की, ही प्रक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला पुन्हा व्हर्जिन व्हायचे आहे. हे माझ्या आत्मप्रतिष्ठेशी संबंधित आहे आणि काही वैयक्तिक कारण आहे, ज्यामुळे ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेवर लोक टीका केल्याशिवाय राहत नाहीत. जगातील प्रत्येक व्यक्ती अशा निवडींना पाठिंबा देत नाही. पण आपण नेहमीच लोकांच्या वैयक्तिक निर्णयांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याची गरज नाही.
हायमेनोप्लास्टी म्हणजे काय?
हायमेनोप्लास्टी ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये योनीच्या खालच्या भागात असलेल्या हायमेनची दुरुस्ती केली जाते. या कॉस्मेटिक शस्त्रक्रियेद्वारे नवीन हायमेन तयार केले जातात. डॉक्टरांच्या मते हायमेनोप्लास्टी इतर शस्त्रक्रियेच्या तुलनेत अधिक धोकादायक असू शकते. हायमेनोप्लास्टीद्वारे व्हर्जिनिटी परत मिळत नाही. हे केवळ प्रतीकात्मकपणे घडते. या शस्त्रक्रियेमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही जास्त असतो. तसेच असेही काही निशाण राहण्याची शक्यता आहे, जे आयुष्यात कधीच मिटवले जाऊ शकत नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.