संग्रहीत छायाचित्र
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. माझ्यापेक्षा पंतप्रधान मोदी चांगले नेगोशिएटर असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला भारत दौऱ्यातील मोदींकडून झालेल्या स्वागताची आठवण केली. दोन्ही देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी फ्रेमवर्कची घोषणा करण्यात आली. यावर्षी अब्जावधी डॉलरसह अधिक संरक्षण विक्री सुरू झाली आहे. क्वाड आणि इंडो पॅसिफिक मजबूत केले जाईल. तहव्वूर राणाला भारताला सोपवले जाईल यासारखे अनेक निर्णय मोदी आणि ट्रम्प यांच्या बैठकीत घेण्यात आले.