'पहले तुम,पहले तुम' - कारमध्ये बसण्यावरून पुतिन आणि किम जोंग यांची एकमेकांना विनंती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी (१९ जून) उत्तर कोरियाला भेट दिली. पुतिन सोलमध्ये उतरल्यानंतर, किम जोंग आणि त्यांच्यात आधी कारमध्ये कोण प्रवेश करेल यावरून चर्चा सुरू असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या दोन हुकूमशहांमध्ये एकमेकांना आदर दाखवण्याची स्पर्धा रंगल्याची चर्चा सुरू आहे.  

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 21 Jun 2024
  • 01:29 pm
world news, Putin and Kim Jong

संग्रहित छायाचित्र

व्हीडीओ व्हायरल झाल्याने आदरातिथ्याची चर्चा

मॉस्को: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी (१९ जून) उत्तर कोरियाला भेट दिली. पुतिन सोलमध्ये उतरल्यानंतर, किम जोंग आणि त्यांच्यात आधी कारमध्ये कोण प्रवेश करेल यावरून चर्चा सुरू असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या दोन हुकूमशहांमध्ये एकमेकांना आदर दाखवण्याची स्पर्धा रंगल्याची चर्चा सुरू आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हीडीओमध्ये व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग कारमध्ये बसण्याकरता एकमेकांना आग्रह करताना दिसत आहेत. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांनी पुतिन यांना आधी कारमध्ये बसण्याची हाताने विनंती केली. परंतु, पुतिन यांनी किम जोंग यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. बराच वेळ दोघेही एकमेकांना गाडीत बसण्यासाठी विनंती करत राहिले. हा व्हीडीओ डेली मेलने आधी प्रसारित केला. हा व्हीडीओ एक्सवर १३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर कमेंट्सही भन्नाट आले आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “किम गाडी चालवत होता. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, बायडन चुकीच्या कारमध्ये चढले असतील. त्या दोघांना वाटते की त्यात बॉम्ब आहे, दुसऱ्या वापरकर्त्याने विनोद केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना रशियन-निर्मित ऑरस लिमोझिन, एक चहाचा सेट आणि ॲडमिरलची डिर्क भेट दिली, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest