संग्रहित छायाचित्र
टोकियो : भर काम केल्यानंतर थकवा घालवण्यासाठी आंघोळ करणे प्रत्येक व्यक्तीला खूप आवडते. पण ज्यांना नेहमी घाई असते त्यांना अंघोळ करण्यासाठी इतका अधिक वेळ मिळत नाही. ही समस्या ओळखून जपानी अभियंत्यांनी माणसांना अंघोळ घालण्याचे नवे यंत्र शोधून काढले आहे. अभियंत्यांनी याला भविष्यातील मानवी वॉशिंग मशीन किंवा मिराई निंगन वॉशिंग मशीन असे नाव दिले आहे.
या मशिनचे वैशिष्ट्ये म्हणजे हे आर्टिफिशियल इंजिनीअरिंगशी जोडलेले आहे. एआयच्या मदतीने ते प्रथम आंघोळ करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे विश्लेषण करते आणि त्यानंतर त्यानुसार शरीराला धुण्याची आणि वाळवण्याची प्रक्रिया सुरू करते. जपानमधील ओवाला येथील शॉवरहेड कंपनीने हे नवे मशिन तयार केले आहे.
त्याच्या शोधाबद्दल कंपनीचे म्हणणे आहे की, हे वॉशिंग मशीनसारखे काम करते, ज्याला एखाद्या व्यक्तीला धुण्यासाठी १५ मिनिटे लागतात. फायटर जेट पॉड किंवा कॉकपिटसारखे दिसणारे हे फ्यूचरिस्टिक मशिन लवकरच जपानमधील ओसाका कान्साई एक्स्पोमध्ये प्रदर्शित होणार आहे. या एक्स्पोमधील १००० पाहुण्यांवर हा प्रयोग केला जाणार आहे.आपल्या संशोधनाबद्दल व मशीनच्या कार्यप्रणालीबाबत अभियंत्यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही तुमच्या प्लॅस्टिकच्या पॉडवर चढता तेव्हा ते अर्ध्यापर्यंत गरम पाण्याने भरलेले असते. त्यानंतर पुन्हा अत्यंत लहान एअर जेट उघडली जातात. यामुळे पाण्यात बुडबुडे फुटतात आणि एक छोटा परंतु शक्तिशाली दाब तयार होतो. त्याच्या माध्यमातून वापरकर्त्याच्या शरीरातील घाण साफ केली जाते. जैविक इलेक्ट्रोड्स सुनिश्चित करतात की आपण योग्य तापमानावर आंघोळ करीत आहात. अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार, हे मशीन केवळ आपले शरीर धुत नाही तर आपले मन शांत करण्याचे काम देखील करू शकते. या मशिनमधील एआय-संचालित सेन्सर जेव्हा आपल्याला शांत होण्याची आवश्यकता असते तेव्हा शरीराबद्दल माहिती शोधण्यास सक्षम आहे. मग त्यानुसार मशीन आपली पुढील प्रक्रिया पूर्ण करते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.