संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी गेल्या वर्षी १० लाख कोटी भारतात पाठवले असून ही विक्रमी रक्कम आहे. जागतिक बँकेने ही माहिती दिली.
परदेशात कमावलेला पैसा देशात परत पाठवण्यात मेक्सिकोचा दुसरा क्रमांक लागतो. तेथील ५ लाख कोटी रुपये आपल्या देशात पाठवले.
या यादीत चीन ४ लाख कोटींसह तिसऱ्या, फिलिपाईन्स ३ लाख कोटींसह चौथ्या आणि पाकिस्तान २ लाख २० हजार कोटींसह पाचव्या स्थानावर आहे. कमी उत्पन्न असलेल्या आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील स्थलांतरितांनी त्यांच्या देशात पैसे पाठवल्याचे दिसून आले आहे. २०२२ मध्येही, अनिवासी भारतीय पैसे मायदेशी पाठवण्यात आघाडीवर होते. जागतिक बँकेच्या माहितीनुसार २०२१ नंतर भारतीय स्थलांतरितांनी गेल्या वर्षी सर्वाधिक रक्कम पाठवली. अमेरिकेतील कामगारांची वाढती मागणी हे भारतीयांनी पैसे पाठवण्याचे मुख्य कारण असल्याचे जागतिक बँकेने नमूद केले आहे. याशिवाय मध्यपूर्वेतील देशांमध्येही कुशल, कमी कुशल लोकांची मागणी वाढत आहे. पाश्चात्य देशांनंतर बहुतांश भारतीय कामाच्या शोधात मध्यपूर्वेत जातात. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, भारतातील सर्वाधिक पैसा अमेरिकेतून आला आहे. यानंतर संयुक्त अरब अमिरातीतून १८ टक्के पैसे आले. यूपीआय पेमेंटमुळे पैसे पाठवणे सोपे झाले आहे. भारतात येणारे सर्वाधिक रुपये सौदी अरेबिया, कुवेत, ओमान आणि कतारमधून आले.