Lahore Airport Fire
पाकिस्तानातील लाहोर येथील विमानतळावर भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून, या आगीमुळे सर्व उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली आहेत. सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीने विमानतळावरील कामकाज ठप्प झाले असून प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
पाकिस्तानातील लाहोर येथील विमानतळावर आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगीमुळे सर्व उड्डाणे तात्काळ रद्द करण्यात आली असून, प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराचे एक विमान लाहोर विमानतळावर उतरत असताना त्याच्या टायरला अचानक आग लागली. या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरक्षेच्या दृष्टीने धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी सैन्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
दरम्यान, लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर लागलेल्या आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये विमानतळावर उपस्थित असलेले लोग धुरामुळे त्रस्त झालेले दिसत आहेत. तसेच आगीमुळे काळ्या धुराचे लोळ वर उठताना दिसत आहे.