Advertisement

इराणचा अमेरिकेला मोठा दणका; इस्फहानमध्ये ‘C-130 हर्क्युलिस’ विमान पाडल्याचा दावा

तेहरान : मध्य-पूर्वेतील युद्ध आता अत्यंत भीषण आणि निर्णायक वळणावर पोहोचले आहे. इराणच्या ‘फराज रेंजर्स’ या विशेष पोलीस कमांडो युनिटने अमेरिकेचे अवाढव्य ‘C-130 हर्क्युलिस’ मालवाहू विमान पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. इराणच्या इस्फहान प्रांतात ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत असून, या वृत्ताने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने अद्याप या घटनेवर अधिकृत मौन बाळगले असले तरी, हा गेल्या दशकातील अमेरिकेसाठी सर्वात मोठा लष्करी धक्का असल्याचे मानले जात आहे.

काय आहे ‘रेस्क्यू मिशन’चा पेच?
काही दिवसांपूर्वीच इराणने अमेरिकेचे ‘F-15 फायटर जेट’ पाडले होते. यातील एका बेपत्ता वैमानिकाला वाचवण्यासाठी अमेरिकेने इस्फहान प्रांतात ‘रेस्क्यू मिशन’ राबवले होते. इराणचा दावा आहे की, याच मोहिमेत सामील असलेल्या C-130 विमानासह दोन ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर्सना त्यांच्या एकात्मिक कमांडने (एयरोस्पेस, थल सेना आणि बासिज युनिट) यशस्वीरित्या लक्ष्य केले.

 

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post
Pimpri Chinchwad Police

Pimpri Chinchwad Police : पाच पोलीस ठाणे वाढणार; ‘या’ ठिकाणी होणार ठाणे

Next Post
Pimpri Chinchwad News

Pimpri Chinchwad News : बडतर्फ ठेकेदाराकडूनच काम?; भामा आसखेड जलवाहिनीचे उर्वरित कामही संबंधित त्याच ठेकेदाराकडून करवून घेण्याचा घाट