संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क: आपल्याकडे ठिकठिकाणी एटीएम मशिन आहेत. त्यातून पैसे काढण्याची सुविधा आहे. रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी व्हेंडिंग मशिन आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेत दूध आणि अंडी मिळवण्यासाठीही व्हेंडिंग मशिन आहेत. अनेक मॉल आणि ग्रोसरी स्टोअर्समध्ये ते मशिन लावले आहेत. परंतु धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत ग्रॉसरी स्टोअर्समध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे व्हेंडिंग मशिन लावले आहेत. त्या ठिकाणी गोळ्या सहज खरेदी करता येतात. अमेरिकेत गोळीबाराचे प्रकार जगात सर्वाधिक होतात. त्यानंतरही बंदुकीच्या गोळ्या मिळवणारे व्हेंडिंग मशिन ठेवल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.
अमेरिकेतील अलाबामापासून ओकलाहोमा आणि टॅक्सासमधील ग्रॉसरी स्टोअरवर बंदुकीच्या गोळ्या मिळणारे मशिन लावले आहेत. दुधाच्या व्हेंडिंग मशिन शेजारी बंदुकीच्या गोळ्या मिळवणारे मशिन लावले आहे. हे मशिन एटीएमप्रमाणे विकसित करता येते. अमेरिकन राउंड्स नावाची कंपनी व्हेंडिंग मशिन ग्रोसरी स्टोअरमध्ये लावत आहेत. आतापर्यंत अलाबामापासून ओकलाहोमापर्यंत आणि टेक्सासमध्ये हे मशिन लावले आहे. या व्हेंडिंग मशिनमध्ये एक आयडेंटिफिकेशन स्कॅनर आणि फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे बंदुकीच्या गोळ्या घेणाऱ्याच्या वयाची माहिती मिळवता येते. त्यानंतरच संबंधित व्यक्तीला मशिनमधून बंदुकीच्या गोळ्या मिळवता येईल.
वयाचे प्रमाणपत्र सक्तीचे
कंपनीचा दावा आहे की, वय व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजीमुळे अधिक फायदा आहे. अन्यथा ऑनलाईन गोळ्या खरेदी करताना कोणत्या वयोगटातील व्यक्ती ते घेत आहे, त्याची माहिती मिळत नाही. परंतु व्हेंडिंग मशिनमध्ये व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजीमुळे वयाचे प्रमाणपत्र रिटेल स्टोरमध्ये द्यावे लागते. या व्हेंडिंग मशिनमध्ये २१ वर्ष वयाचे व्यक्ती सहज गोळ्यांची खरेदी करू शकतात. अमेरिकेतील अनेक किराणा दुकानांमध्ये या व्हेंडिंग मशिन्स बसवण्यासही विरोध होत आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत सामूहिक गोळीबाराच्या अशा १५ घटना घडल्या आहेत. या स्थितीत किराणा दुकानात खुलेआम गोळ्या मिळत असल्याने गोळीबाराच्या घटनांमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.