संग्रहित छायाचित्र
पुणे : विश्वचषक क्रिकेट (World Cup Cricket) स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात भारताला मोठा झटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उर्वरित स्पर्धेसाठी अनफिट घोषित करण्यात आले आहे. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बांगलादेशविरुद्ध विश्वचषक सामन्यात हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याला फक्त तीन चेंडू गोलंदाजी करता आली.
भारताच्या गेल्या तिन्ही सामन्यात हार्दिक पांड्या संघाच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता. हार्दिक पांड्या पुनरागमनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. मात्र, अजूनही त्याची दुखापत गंभीर आहे.बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना डाव्या घोट्याच्या दुखापतीने तो त्रस्त होता.
रविवारी कोलकाता येथील प्रतिष्ठित ईडन गार्डन्सवर भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. यावेळी कृष्णाच्या कामगिरीकडे लक्ष असेल.