Cricket | चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी धडाकेबाज क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा, 'या' दिवशी खेळणार कारकिर्दीतील शेवटचा सामना...

गुरुवारपासून गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Tue, 4 Feb 2025
  • 01:14 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र....

Sri Lankan cricketer announced his retirement | श्रीलंकेच्या सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक आणि माजी कर्णधार दिमुथ करुणारत्ने यांनी त्यांच्या १०० व्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. गुरुवारपासून गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल. अशाप्रकारे, २०१२ मध्ये कसोटी पदार्पण करणारा करुणारत्ने क्रिकेटच्या सर्व फाॅरमॅटमधून निवृत्त होईल.

करुणारत्ने याने आपल्या शानदार कारकिर्दीत १६ कसोटी शतके आणि ३९ अर्धशतके झळकावली. अशाप्रकारे, त्याने श्रीलंकेच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून आपला वारसा सोडला आहे. त्याने संघासाठी ५० एकदिवसीय सामने खेळले आणि ३१ पेक्षा जास्त सरासरीने १३१६ धावा केल्या. या फॉर्मेटमध्ये सलामीवीर फलंदाजाने एक शतक आणि ११ अर्धशतके ठोकली. २०१९ च्या आयसीसी विश्वचषकात तो संघाचा कर्णधारही होता.

शेवटच्या कसोटीत करुणारत्नेचा शतकी खेळीचा प्रयत्न....

आपल्या ५० व्या कसोटी सामन्यात शतक ठोकण्याचा विक्रम करणाऱ्या दिमुथ करुणारत्नेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील कसोटीत शतक ठोकण्याची इच्छा आहे. तो म्हणाला की, जर त्याने शतक केले तर ते त्याच्यासाठी खूप चांगले होईल. तो म्हणाला, "माझ्या १०० व्या कसोटीतच नाही तर मी प्रत्येक सामन्यात शतक झळकावण्यास आणि माझ्या संघासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे.' जर मी माझ्या १०० व्या कसोटीत शतक करू शकलो तर ती एक मोठी कामगिरी असेल."

१०० कसोटी खेळणे ही एक मोठी कामगिरी...

दिमुथ करुणारत्ने यांनी असेही म्हटले की, "तो त्याच्या कारकिर्दीवर समाधानी आहे आणि त्याच्या संघासाठी १०० कसोटी सामने खेळणे ही त्याच्यासाठी मोठी कामगिरी आहे. तो पुढे म्हणाला, 'कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते की तो १०० कसोटी खेळून १०,००० धावा करेल.' ही एक मोठी उपलब्धी आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही त्या लक्ष्यांबद्दल विचार करत नाही, परंतु जसजसे तुम्ही खेळत राहता तसतसे वेगवेगळे लक्ष्य तुमच्यासमोर येत राहतात."

Share this story

Latest