Smriti Mandhana breaks another record..
Smriti Mandhana breaks another record | आयर्लंडविरुद्ध शुक्रवारी (दि.10 जानेवारी) खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार स्मृती मंधानाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मंधानाने या सामन्यात 29 चेंडूत 6 चौकार आणि एक षटकारासह 41 धावांची जलद खेळी केली. यासह मंधानाने एका खास बाबतीत मिताली राजला मागे टाकले आहे.
स्मृती मंधाना ही महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 4 हजार धावा पूर्ण करणारी भारताची फलंदाज ठरली आहे. तिने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या 95 व्या डावात ही कामगिरी केली. मंधानाने मिताली राजचा विक्रम मोडित काढला आहे. मितालीने 112 व्या डावात ही कामगिरी केली होती.
𝗠𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲 𝗨𝗻𝗹𝗼𝗰𝗸𝗲𝗱 🔓
— BCCI Women (@BCCIWomen) January 10, 2025
4⃣0⃣0⃣0⃣ ODI runs and going strong! 👍 👍
Congratulations, Smriti Mandhana 👏 👏
UPDATES ▶️ https://t.co/bcSIVpiPvQ#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kI32uFeRX0
त्याचप्रमाणे, पुरुष क्रिकेटमध्येही भारताकडून मंधानापेक्षा फक्त विराट कोहलीनेच 4 हजार धावा जलद पूर्ण केल्या आहेत. विराटने 4 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 93 डाव खेळले. जागतिक महिला क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, मेग लॅनिंग आणि बेलिंडा क्लार्क यांनी मंधानापेक्षा 4 हजार धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. लॅनिंगने 87 डावांमध्ये तर क्लार्कने फक्त 86 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे.