'ती' आली अन् पृथ्वीचा खेळ बहरला
#नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघात खेळणारा युवा, स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉसाठी आयपीएल २०२३ आतापर्यंत फारसे समाधानकारक गेलेले नाही. मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फोल ठरला. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. पण दिल्ली कॅपिटल्सने त्याला धरमशालामध्ये पंजाब किंग्जविरुद्ध आणखी एक संधी दिली. पृथ्वीने ही संधी दोन्ही हातांनी पकडली आणि पुरेपूर फायदा उठवला. पंजाबविरुद्ध वेगवान फलंदाजी करताना शॉने अर्धशतक झळकावले आणि पुन्हा एकदा सर्वांना आपल्या क्षमतेची चुणूक दाखवली. त्याच्या या बहारदार अर्धशतकी खेळीमागे एका 'अदृश्य' युवतीचा हात असल्याचे आता समोर आले आहे.
पृथ्वी शॉने पंजाब किंग्जविरुद्ध ३८ चेंडूंचा सामना केला आणि १४२.११ च्या स्ट्राइक रेटने ५४ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकारही ठोकला. पंजाबविरुद्ध त्याने दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. त्याचवेळी शॉला या सामन्यात स्टेडियममधून विशेष साथ मिळाली. या सामन्यात शॉचे समर्थन करण्यासाठी निधी तापडियाशिवाय कोणीही पोहोचले नव्हते, तिच्यासोबत शॉचे नाव अनेकदा चर्चेत असते. निधीने शॉच्या जबरदस्त फलंदाजीबद्दल इंस्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर केली आहे, जी स्वतः पृथ्वीनेही शेअर केली आहे.
कोण आहे निधी तापडिया ?
पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड निधी तापडिया ही महाराष्ट्रातील नाशिकची रहिवासी आहे. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिला १७ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निधीने वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेतले आहे. निधी लोकप्रिय क्राईम शो सीआयडीचा भाग देखील आहे. शॉ आणि निधीबद्दल सांगायचे तर, दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट शेअर करताना दिसले आहेत. मात्र, पृथ्वी किंवा निधी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, गेल्या 'व्हॅलेंटाइन डे' च्या दिवशी शॉने निधीसोबतचा एक फोटो शेअर करून तो डिलिट केला. इतकेच नाही तर आता निधी पृथ्वीचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात येत आहे. या सगळ्या गोष्टींवरून दोघेही छुप्या नात्यात असल्याचे उघड झाले आहे. एकेकाळी केएल राहुल आणि अथिया शेट्टी होते. मात्र, शॉ आणि निधी रिलेशनशिपमध्ये आहेत, मात्र अद्याप या गोष्टीला दुजोरा मिळालेला नाही.
गुणतालिकेत दिल्लीने पंजाबचे समीकरण बिघडवले
पंजाबच्या पराभवामुळे मुंबई आणि आरसीबीसाठी प्लेऑफची शर्यत सोपी झाली आहे. आता या दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित सामने जिंकायचे आहेत आणि यापैकी एका संघाने प्लेऑफ खेळायचे हे निश्चित केले जाईल. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आता चेन्नई, लखनौ , मुंबई आणि आरसीबी या तिन्ही स्थानांसाठी सर्वात मजबूत दावा आहे. राजस्थान, कोलकाता आणि पंजाब हे संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत, मात्र हे संघ त्यांच्या नशिबावर अवलंबून अंतिम चारमध्ये स्था स्थान मिळवू शकतील.