संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: रिकी पाँटिंग पुढील हंगामात आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक असणार नाही. त्याने दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षकपद सोडले आहे. खुद्द दिल्ली कॅपिटल्स फ्रॅंचायसीने सोशल मीडियावर ही माहिती दिली.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग गेली सात वर्षे दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक होता.
त्याच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्स कधीही चॅम्पियन बनला नाही. पाँटिंगनंतर सध्याचे संघसंचालक सौरव गांगुली यांच्याकडे पुढील हंगामात मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
कार अपघातानंतर ऋषभ पंतच्या पुनरागमनात रिकी पाँटिंगने महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्याबद्दल सोशल मीडियावर लिहिले, ‘‘सात वर्षांत तुम्ही संघाला अनेक गोष्टी शिकवल्या. तुमचे योगदान शब्दात मांडणे शक्य नाही.’’
ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या संघाचा दोन वेळा कर्णधार राहिलेला पाँटिंग २०१९ मध्ये दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ २०२१ मध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. २०१९आणि २०२० मध्ये प्लेऑफसाठी पात्र. २०२१ नंतर संघाची कामगिरी घसरली. हा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर आहे.
संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे आपल्या पदावर कायम राहणार आहेत. सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीचे सहमालक या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला गांगुलीची भेट घैणार आहेत. त्यात मुख्य प्रशिक्षकपदाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.