IPL 2025 (PBKS vs KKR Toss & Playing 11 Update)
IPL 2025 (PBKS vs KKR Toss & Playing 11 Update) | आयपीएल २०२५ चा ३१ वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथे होणार आहे. या हंगामात पंजाबची कामगिरी चांगली झाली आहे. त्यांनी पाच सामने खेळले आहेत आणि तीन जिंकले आहेत. दुसरीकडे कोलकाता संघाने ६ सामने खेळले आहेत आणि तीन सामने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते.
तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी केकेआरने एक बदल केला आहे आणि मोईन अलीच्या जागी अँरिक नॉर्टजेचा प्लेइंग-११ मध्ये समावेश केला आहे. त्याच वेळी, स्टोइनिस पंजाबकडून या सामन्यात खेळत नाहीये आणि त्याच्या जागी जोश इंग्लिसला संधी मिळाली आहे. याशिवाय, बार्टलेटने जखमी लॉकी फर्ग्युसनची जागा घेतली आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and opted to bat first against @KKRiders.
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
Updates ▶️ https://t.co/sZtJIQpcbx#TATAIPL | #PBKSvKKR pic.twitter.com/ZkwM17fknM
PBKS vs KKR: दोन्ही संघाची प्लेइंग-11 पुढीलप्रमाणे....
पंजाब किंग्ज : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
प्रभावशाली खेळाडू : विजयकुमार विशाक, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे.
कोलकाता नाइट रायडर्स : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, ॲनरिक नॉर्टजे, वरुण चक्रवर्ती.
प्रभावशाली खेळाडू : मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, लवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय.
हेड टू हेड रेकॉर्ड...
जर आपण हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर कोलकाता नाईट रायडर्स वरचढ दिसते. केकेआरने आतापर्यंत पंजाबविरुद्ध २१ सामने जिंकले आहेत. तर पंजाबने १२ सामने जिंकले आहेत. पण या सामन्यात केकेआरला कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांना पराभूत केले होते.