Everest Base Camp : एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पुण्याच्या प्रशिल अंबादे यांनी फडकाविला तिरंगा

प्रशिल जयदेव अंबादे (Prashil Jaidev Ambade) यांनी भारत नेपाल मोहिमेअंतर्गत एवरेस्ट बेस्ट कॅम्प वर केलेल्या यशस्वी चढाईबद्दल पर्यावरण अभ्यासक राकेश धोत्रे यांनी सत्कार केला. शनिवारी हा सत्कार कार्यक्रम भुकुम येथे झाला.

 Everest Base Camp

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पुण्याच्या प्रशिल अंबादे यांनी फडकाविला तिरंगा

पुणे: प्रशिल जयदेव अंबादे (Prashil Jaidev Ambade) यांनी  भारत नेपाल मोहिमेअंतर्गत एवरेस्ट बेस्ट कॅम्प वर केलेल्या यशस्वी  चढाईबद्दल पर्यावरण अभ्यासक राकेश धोत्रे यांनी सत्कार  केला. शनिवारी हा सत्कार कार्यक्रम भुकुम येथे झाला. (Pune News) या प्रसंगी धीरज नंदनवार, सिद्धांत बबन कनाके आणि प्रतीक अंबादे  उपस्थित होते. या बेस कँप मोहिमेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्य महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली येथील आठ गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला.

प्रशिल अंबादे यांनी या मोहिमे अंतर्गत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट च्या बेस कॅम्प ज्याची समुद्रसपाटीपासून उंची 17,598 फूट आहे,या जागेवर पोहोचून तिरंगा फडकवला. तेरा दिवस चाललेल्या या मोहिमेमध्ये कमी वायुदाब, कमी ऑक्सिजन,लांबवर पसरलेले रस्ते आणि उपलब्ध पाणी अशा अनेक कठीण परिस्थितीला पार करत समोर जावे लागले.

सत्कार प्रसंगी बोलताना राकेश धोत्रे म्हणाले की, प्रशिलने एव्हरेस्ट बेस कॅम्प वर पोहोचून लोकांना पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे ग्लेशर वितळून होणाऱ्या नुकसाना बद्दल माहिती दिली.लोकांना स्वच्छतेचा संदेश तसेच जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी विनंती केली आहे जेणेकरून येणाऱ्या काळात जागतिक तापमान वाढीमुळे वितळणाऱ्या ग्लेशरला आपण वाचवू शकू, तसेच वृक्षतोडीमुळे जागतिक तापमान वाढ होऊन पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच जागतिक तापमान वाढीला कमी करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा एकमेव मार्ग आहे असेही सांगितले, प्रशिल हे मूळ चंद्रपूर चे असून कोथरुड मध्ये राहतात. यू ट्यूब वर ते जन जागृती करतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story