Preity Zinta Slams Morphed Image
जयपूर | अलिकडेच अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटा राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशीला मिठी मारत असतानाचा एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो माॅर्फ असल्याचे प्रीतीने स्पष्ट केले.
प्रीतीने एक्स वर लिहिले की, ‘‘हे चित्र पूर्णपणे बनावट आहे, मला आश्चर्य वाटते की वृत्तवाहिन्यादेखील असे बनावट चित्र दाखवत आहेत. अशा बनावट प्रतिमा बातम्या म्हणून दिल्या जात आहेत. हा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे आणि काही वृत्तवाहिन्या त्यामागे आहेत.’’
This is a morphed image and fake news. Am so surprised now news channels are also using morphed images and featuring them as news items !
— Preity G Zinta (@realpreityzinta) May 20, 2025
१८ मे रोजी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यानंतर, प्रीती झिंटाने वैभव सूर्यवंशीशी हस्तांदोलन केले. हा फोटो राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरही शेअर करण्यात आला होता, परंतु तो मॉर्फ करून इंटरनेटवर व्हायरल करण्यात आला.
वैभव सूर्यवंशी हा यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. यात त्याने २०६.५५च्या स्ट्राईक रेटने आणि ३६च्या सरासरीने २५२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतकी खेळीदेखील केली, जी कोणत्याही भारतीय फलंदाजाने ठोकलेल्या सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे. वैभवने या हंगामात २४ षटकार आणि १८ चौकार मारले आहेत.