ITF Tennis : एमएसएलटीएच्या वतीने 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेचे आयोजन

राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा 20 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी होणार आहे.

ITF Tennis

एमएसएलटीएच्या वतीने 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेचे आयोजन

भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण एटीपी गुण मिळवण्याची संधी

राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने  25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा 20 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी होणार आहे. (ITF Tennis) 

एमएसएलटीएचे मानद सचिव व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत 17 देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून मुंबईमध्ये सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येत आहे.  या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण एटीपी गुण व पारितोषिक रक्कम मिळवण्याची संधी मिळणार आहे.  

तसेच,  भारतीय टेनिसपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी व गुण प्राप्त करता यावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत डेव्हिसकूपर रामकुमार रामनाथन, दिग्विजय प्रताप सिंग, सिद्धार्थ रावत यांसह करण सिंग, सिद्धार्थ विश्वकर्मा, देव जाविया, मनीष सुरेशकुमार हे मानांकित खेळाडू झुंजणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले. 

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व 50 एटीपी गुण, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 30 एटीपी गुण देण्यात येणार आहेत. याशिवाय उपांत्यफेरीतील खेळाडूला 18गुण, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला 9 गुण, उप-उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूस 5 गुण आणि पहिल्या फेरीतील खेळाडूस 1गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने शनिवार, 20 नोव्हेंबर व रविवार, 21 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य ड्रॉच्या फेरीचे सामने 21 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. स्पर्धेसाठी थायलंडच्या अमोर्न दुआंगपिंकीन यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

स्पर्धेतील मुख्य ड्रॉमधील मानांकित खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे: 

1.एव्हेग्नी डोंस्कॉय(रशिया, 262), 2. लुईस वेसेल्स(जर्मनी, 342), 3.वाल्दीस्लाव्ह ओर्लोव्ह(युक्रेन,470), 4. दिग्विजय प्रताप सिंग(भारत, 501), 5.रियुकी मात्सुदा(जपान, 569), 6. रामकुमार रामनाथन(भारत, 579), 7. सिद्धार्थ रावत(भारत, 601), 8. एसडी प्रज्वल देव(भारत, 623).

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story