Neeraj Chopra
Neeraj Chopra Javelin Throw (Bangalore) | ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने शनिवारी बेंगळुरू इथे झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक २०२५ - ए वर्ल्ड अॅथलेटिक्स गोल्ड-लेव्हल इव्हेंटच्या पहिल्या आवृत्तीत विजेतेपद पटकावलं. त्याने ८६ पूर्णांक १८ शतांश मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावलं.
केनियाचा ज्युलियस येगो हंगामातील ८४ पूर्णांक ५१ शतांश मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर श्रीलंकेचा रुमेश पाथिराज ८४ पूर्णांक ३४ शतांश मीटरच्या थ्रोसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
बेंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेतील यशासह नीरजने चालू वर्षात सलग तिसरे विजेतेपद पटकावले. त्याने यापूर्वी पॅरिस डायमंड लीग (२० जून) आणि पोलंडमधील ओस्ट्रावा येथे गोल्डन स्पाइक (२४ जून) येथे विजेतेपद जिंकले होते.
ही स्पर्धा जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. याला अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) ने मान्यता दिली होती. नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत १२ भालाफेकपटूंनी सहभाग घेतला होता, ज्यात सात अव्वल आंतरराष्ट्रीय भालाफेकपटूंचा समावेश होता. चोप्रा याच्यासह पाच भारतीय खेळाडूंनीही देखील यात भाग घेतला होता.