Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये खांदेपालट, पाच वेळा विजेतेपद मिळवणारा रोहित कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त

इंडियन प्रीमियर लीग २०२४ (Indian Premier League 2024) ला प्रारंभ होण्यापूर्वी (IPL) मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) खांदेपालट झाला असून हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) संघाचा कर्णधार बनवले आहे.

Mumbai Indians

संग्रहित छायाचित्र

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२४ (Indian Premier League 2024) ला प्रारंभ होण्यापूर्वी (IPL) मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians)  खांदेपालट झाला असून हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) संघाचा कर्णधार बनवले आहे. मुंबईने काही दिवसांपूर्वीच गुजरात टायटन्सकडून  हार्दिक पंड्याला संघात घेतले होते. त्यावेळीही यामागे त्याला कर्णधार बनविण्याची पावले दिसत होती. याआधी रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. रोहित दीर्घकाळ संघाचा कर्णधार होता. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा विजेतेपद पटकावले होते. आता रोहितला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. पंड्याने गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले होते. 

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून पंड्याला कर्णधार नियुक्त केल्याची माहिती दिली आहे. मुंबई इंडियन्स निवेदनात म्हणते की, मुंबई इंडियन्स कर्णधार बदलाची घोषणा करत आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या पुढच्या सत्रात संघाचा कर्णधार असेल. 

पाच वेळा विजेतेपद 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवले आहे.आमची टीम रोहित शर्माची आभारी आहे. २०१३ पासून आतापर्यंतचा त्याचा कार्यकाळ उत्कृष्ट राहिला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ पाच वेळा चॅम्पियन ठरला आहे. मुंबईने आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावले. रोहितची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर ती सर्वोत्तम राहिली आहे. त्याने २४३ सामन्यात ६२११ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि ४२ अर्धशतके केली आहेत. रोहितने एप्रिल २००८ मध्‍ये करिअरचा पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्याने डेक्कन चार्जेसकडून पदार्पण केले होते.

अखेर हार्दिक ज्या हेतूसाठी मुंबई इंडियन्समध्ये आला तो हेतू पूर्ण झाला. तो आता रोहित शर्माचा उत्तराधिकारी असणार आहे. मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने ही घोषणा करताना मुंबई इंडियन्सने एका रणनीतीनुसार हार्दिक पंड्याला कर्णधार केले असल्याचे सांगितले. मुंबई इंडियन्सला भविष्यासाठी तयार करायचं आहे. मुंबई इंडियन्सचं सुदैव आहे की, संघाला कायम दमदार नेतृत्व मिळालं आहे. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग ते रिकी पाँटिंग अन् रोहितपर्यंत सर्वांनी मुंबई इंडियन्सच्या यशात आपले योगदान दिले. आम्ही कायम भविष्यातील संघ तयार करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असतो. त्यामुळेच हा दृष्टिकोन ठेवून आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story