MI vs DC Toss & Playing 11 Update
MI vs DC Toss & Playing 11 Update | आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना आज बुधवार, २१ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. आजचा मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना हा एखाद्या उपांत्य सामन्यापेक्षा कमी नाही, कारण आजचा हा सामना जिंकणारा संघ प्लेऑफच्या जवळ जाईल. एमआय विरुद्ध डीसीचा हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याकडून अक्षर पटेल टॉससाठी आला नाही. फाफ डू प्लेसिसने सांगितले की, अक्षरला फ्लू आहे त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने कॉर्बिन बॉशच्या जागी मिचेल सँटनरला संघात समाविष्ट केले आहे.
दोन्ही संघाचं Playing 11 खालीलप्रमाणे...
मुंबई इंडियन्स : रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह. [प्रभावशाली खेळाडू: कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, राज बावा, अश्विनी कुमार, सत्यनारायण राजू.]
दिल्ली कॅपिटल्स: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार. [प्रभावशाली खेळाडू: केएल राहुल, सिदीकुल्ला अटल, करुण नायर, त्रिपुराण विजय, मनवंत कुमार एल.]
🚨 Toss 🚨@DelhiCapitals won the toss and elected to bowl against @mipaltan in Mumbai.
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
Updates ▶️ https://t.co/fHZXoEKt3L#TATAIPL | #MIvDC pic.twitter.com/xEvuPMF07X
दरम्यान, आयपीएल पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्स १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबईने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने ७ सामने जिंकले आहेत आणि ५ सामने गमावले आहेत. दिल्लीने १२ पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि ५ सामने गमावले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. जर मुंबईने आजचा सामना जिंकला तर ते १६ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरेल. जर दिल्लीने विजय मिळवला तर दोन्ही संघांसाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा होईल.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि दिल्लीचे संघ ३६ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. या ३६ सामन्यांपैकी मुंबईने २० सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने १६ वेळा विजयाची चव चाखली आहे. आजचा सामना कोणता संघ जिंकतो ते आपल्याला पाहावे लागेल.