IPL 2025 (RR vs KKR)
IPL 2025 (Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders Match Highlights) : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना हा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. आयपीएलच्या 18 व्या मोसामातील सहाव्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. केकेआरने 152 धावांचं आव्हान 17.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावताना 153 धावा करत सहज गाठलं. केकेआरचा हा या मोसमातील दुसऱ्या सामन्यातील पहिला विजय ठरला. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानला सलग दुसरा सामना गमवावा लागला.
𝙑𝙞𝙣𝙩𝙖𝙜𝙚 QDK 😍
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
Quinton de Kock bags the 'Player of the Match' award for his rock solid innings of 97*(61) 👏👏
Scorecard ▶ https://t.co/lGpYvw87IR#TATAIPL | #RRvKKR | @KKRiders pic.twitter.com/88CK9DRitu
विजयासाठी 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरला मोईन अली आणि क्विंटन डी कॉकने चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी झाली. अलीला महिष तिक्षाने धावबाद केले. यानंतर डी कॉकला कर्णधार अजिंक्य रहाणेची साथ मिळाली. दोघांनी 24 चेंडूत 29 धावा जोडल्या.
11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रहाणेला तुषार देशपांडेकरवी वानिंदू हसरंगाने झेलबाद केले. 15 चेंडूत 18 धावा करून तो बाद झाला. यानंतर यष्टीरक्षक फलंदाज डी कॉकला प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या आंग्रिश रघुवंशीची साथ लाभली. या दोघांनी 83 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. या दोघांनी 83 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. या सामन्यात डी कॉक 97 धावांवर नाबाद राहिला तर रघुवंशी 22 धावांवर नाबाद राहिला.
क्विंटन डी कॉकने 18व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, तो आपल्या शतकापासून 3 धावा दूर राहिला. त्याने 61 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. राजस्थानकडून गोलंदाजीत हसरंगाशिवाय कोणत्याही गोलंदाजाला यश मिळाले नाही.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर रियान परागच्या संघाने 20 षटकांत नऊ गडी गमावून 151 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. या सामन्यात राजस्थानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी झाली. वैभव अरोराने चौथ्या षटकात यष्टिरक्षक फलंदाज सॅमसनला बोल्ड केले. 11 चेंडूत 13 धावा करून तो बाद झाला. यानंतर रियान पराग आणि जैस्वाल यांनी पदभार स्वीकारला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 धावा जोडल्या. कर्णधार पराग 25 धावा करू शकला.
राजस्थानकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली. त्यांच्याशिवाय नितीश राणाने आठ धावा, वानिंदू हसरंगाने चार धावा, शुभम दुबेने नऊ धावा, जोफ्रा आर्चरने १६ धावा केल्या. तर महिष तेक्षाना आणि तुषार देशपांडे यांनी अनुक्रमे एक आणि दोन धावा करून नाबाद राहिले.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी, पाचही गोलंदाजांनी त्यांची पूर्ण षटके टाकली. वैभव अरोराने 4 षटकात 33 धावा देत 2 बळी घेतले. हर्षित राणानेही 36 धावा देत 2 फलंदाज बाद केले. दोघेही किफायतशीर होते पण फिरकीपटूंनी अधिक प्रभावित केले. मोईन अलीने केवळ 23 तर वरुण चक्रवर्तीने 4 षटकात केवळ 17 धावा दिल्या. चारही गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर स्पेन्सर जॉन्सनच्या नावावर 1 बळी होता.