Jay Shah & Thomas Bach...
लाॅसने | ब्रिस्बेन येथे २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाक यांची भेट घेतली.
मंगळवारी आयसीसीने जय शाह यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, आयसीसीने लिहिले, ‘‘ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयसीसी आध्यक्ष जय शाह यांनी या आठवड्यात स्वित्झर्लंडमधील लुझन येथे आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांची भेट घेतली.’’ शाह यांनी गेल्या महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंचीही भेट घेतली होती. आयओसीची येत्या ३० जानेवारी रोजी स्वित्झर्लंडमधील लॉसने येथील ऑलिम्पिक हाऊसमध्ये होणार आहे. या बैठकीत २०३२च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशावर चर्चा होणार आहे.
Momentum continues to build around cricket’s inclusion as an @Olympics sport at the @LA2028 Games and beyond, with @JayShah meeting International Olympic Committee (IOC) President Thomas Bach in Lausanne, Switzerland this week. pic.twitter.com/hiySGMGNPg
— ICC (@ICC) January 21, 2025
ब्रिस्बेनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीदरम्यान शाह ब्रिस्बेनमध्ये होते, तेव्हा त्यांनी २०३२ च्या ब्रिस्बेन ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी केली होती. शहा यांनी ऑलिम्पिक आयोजन समितीच्या प्रमुख सिंडी हुक आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) सीईओ निक हॉकली यांच्याशीही बैठक घेतली. तेव्हा जय शाह म्हणाले होते की, आम्ही २०२८ च्या लाॅस एंजेलिस ऑलिम्पिक खेळांसाठी तयारी करत असताना क्रिकेटसाठीही हा रोमांचक काळ आहे. जगभरातील चाहत्यांसाठी क्रिकेट अधिक आकर्षक बनवण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत.’’
२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव म्हणून जय शहा यांनी या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०२८ नंतर २०३२ च्या ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा समावेश व्हावा, यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे.