Jasmine Paolini
पॅरिस | मोनिका सेलेसनंतर पहिल्यांदाच जास्मिन पाओलिनीने इटालियन ओपनमध्ये एकेरी आणि दुहेरी दोन्ही विजेतेपदे जिंकली. तिने सारा एरानीसोबत दुहेरीचे विजेतेपद जिंकले आणि एकेरीत कोको गॉफला हरवून १९८५ नंतर रोममध्ये एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली इटालियन महिला ठरली.
जास्मिन पाओलिनीने 'इंटरनॅझिओनाली बीएनएल डी'इटालियामध्ये तिचे पहिले क्ले जेतेपद जिंकून रोममध्ये इतिहास रचला. तिने अंतिम फेरीत कोको गॉफला ६-४, ६-२ असे हरवले आणि चार दशकांत प्रथमच इटालियन इंटरनॅशनलच्या महिला एकेरीत इटालियन विजेती बनली. हे पाओलिनीचे तिसरे WTA एकेरी विजेतेपद होते आणि क्लेवर तिचे पहिलेच विजेतेपद होते.
पुरूषांमध्ये अल्काराझ ठरला विजेता...
दुसरीकडे, इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझने जॅनिक सिन्नरचा ७-६ (७/५), ६-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. या हंगामातील अल्कराजचे हे तिसरे जेतेपद ठरले. यासह तो जागतिक क्रमवारीत सिन्नरनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. मोंटे कार्लोमधील विजयानंतर अल्काराझचे हे वर्षातील ‘मास्टर्स १०००’ स्पर्धेचे दुसरे विजेतेपद आहे.
गेल्या वेळी चायना ओपनच्या अंतिम फेरीत अल्कराझकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर सिनेरची २६ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली होती. २०२४च्या सुरुवातीपासून टूर फायनलमध्ये सिनरला हरवणारा अल्कराझ हा एकमेव खेळाडू आहे. २०२४च्या सुरुवातीला इटालियन ओपनच्या आधी अल्कराजने जॅनिक सिनरला हरवले होते. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून सिनरला एकापेक्षा जास्त वेळा हरवणारा अल्काराज हा एकमेव टेनिसपटू आहे. त्याने आतापर्यंत सलग चार वेळा ही कामगिरी केली आहे.