Advertisement

IPL 2026(RR vs GT) : तुषारच्या हुशार गोलंदाजीमुळे राजस्थानची गुजरातवर मात….

– शेवटच्या षटकात टायटन्सला विजयासाठी ११ धावा हव्या असताना दिल्या केवळ ४ धावा

अहमदाबाद : गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदनावर पराभवाचा दणका देताना राजस्थान राॅयल्सने सहा धावांनी विजय मिळवला. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी ११ धावांची गरज असताना तुषार देशपांडेने केवळ चार धावा देत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला.

या हाय स्कोअरिंग सामन्यात मोक्याच्या क्षणी पाच षटकांत सहा विकेट गमावल्यामुळे गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबाद येथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, राजस्थानने ६ बाद २१० धावा केल्या. गुजरातने कडवी झुंज दिली, परंतु त्यांना ८ बाद २०४ धावाच करता आल्या.

२११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ११ व्या षटकात गुजरातने १०७ धावांवर केवळ एकच विकेट गमावली होती. मात्र, १५व्या षटकापर्यंत या संघाची अवस्था ७ बाद १६१ अशी झाली. रवी बिश्झोईने साई सुदर्शन (७३ धावा, ४४ चेंडू, ३ षटकार, ९ चौकार), ग्लेन फिलिप (३), वाॅशिंग्टन सुंदर (४), राहुल तेवातिया (१२) यांना बाद केले. यानंतर रशीद खान आणि कागिसो रबाडा यांनी जिद्दीने फलंदाजी करीत गुजरातला विजयाकडे नेले. गुजरातला सामना जिंकण्यासाठी ४ षटकांत ४० धावांची गरज असताना या जोडीने दोन षटकांत २५ धावा फटकावत राजस्थानच्या उरात धडकी भरवली. मात्र, १२ चेंडूंत १५ धावा हव्या असताना जोफ्रा आर्चरने १९व्या षटकात केवळ ४ धावा देत सामन्यात रंगत आणली.

अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी ११ धावांची गरज असताना तुषारने पहिल्या चार चेंडूंत केवळ चार धावा देत रशीद आणि रबाडा यांच्यावर दबाव वाढवला. पाचव्या षटकात रशीदने (१६ चेंडूंत २४ धावा, ३ चौकार) डीप पाॅईंटवरून षटकाराच्या इराद्याने शाॅट मारला. मात्र, आर्चरने अफलातून झेल झेताच राजस्थानच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. रबाडा २३ धावांवर (१६ चेंडूंत २३ धावा, २ षटकार, १ चौकार) नाबाद राहिला. ४१ धावांत चार विकेट घेणारा रवी बिष्णोई ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.

तत्पूर्वी, ध्रुव जुरेलच्या ७५ (४२ चेंडूंत ५ षटकार, ५ चौकार), यशस्वी जयस्वालच्या ५५ (३६ चेंडूंत ३ षटकार, ६ चौकार) आणि वैभव सुर्यवंशीच्या ३१ धावांच्या (१८ चेंडूंत १ षटकार, ५ चौकार) जोरावर राजस्थानने दोनशेपार मजल मारली होती. यशस्वी-वैभव जोडीने ३८ चेंडूंत ७० धावांची सलामी देत राजस्थानला वेगवान प्रारंभ करून दिला. यशस्वी-ध्रुव यांनी ५६ धावांची भागिदारी केली. अखेरच्या षटकांत शिमराॅन हेटमायरचा (८ चेंडूंत १८ धावा, २ षटकार, १ चौकार) अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने वेगवान प्रारंभानंतरही राजस्थानला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. गुजराततर्फे रबाडाने दोन विकेट घेतल्या.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

IPL 2026 (MI vs DC) : दिल्लीचा सलग दुसरा विजय; मुंबईवर ६ विकेटने मात...

Next Post

IPL 2026 (SRH vs LSG) | मोहम्मद शमी अन् ऋषभ पंतची चमकदार कामगिरी, लखनौचा हैदराबादवर ५ विकेट राखून विजय....