Advertisement

IPL 2026 | विक्रमादित्य मोहम्मद शमी…! आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा असा पराक्रम करणारा ठरला एकमेव गोलंदाज…

आयएपीएलमध्ये पाचव्यांदा घेतली पहिल्याच चेंडूवर विकेट

लखनौ : दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला सहा विकेटने नमवले. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पाचव्यांदा पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. मोहम्मद शमीने पाचव्यांदा आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आयपीएलमधील आपले अव्वल स्थान अधिक बळकट केले. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या प्रवीण कुमार आणि उमेश यादव या गोलंदाजांनी प्रत्येकी तीन वेळा असा पराक्रम केला आहे.

शमीने दोन वेगवेगळ्या संघांकडून पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली, हे विशेष. २०२२ मध्ये गुजरात टायटन्सकडून त्याने केएल राहुलला (लखनौ) पहिल्याच चेंडूवर बाद केले होते, आता लखनौ सुपर जायंट्ससाठी पदार्पण करतानाही त्याने राहुलला शून्यावर (दिल्ली कॅपिटल्स) पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात दोन खेळाडूंनी आयपीएलमध्ये पदार्पण केले. दिल्लीने श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसंकाला पदार्पणाची कॅप दिली. तर लखनौसाठी अनकॅप्ड भारतीय मुकुल चौधरीने पहिला आयपीएल सामना खेळला.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

PMC | सुट्टीच्या दिवशीही महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत; सभागृह नेते गणेश बिडकरांकडून अधिकाऱ्यांची बैठक

Next Post

महसूल वाढीचा पालिकेचा मास्टर प्लॅन, महापालिकेच्या आर्थिक बळकटीसाठी स्वतंत्र 'महसूल वाढ समिती' स्थापन; उत्पन्न वाढीवर देणार भर