Advertisement

IPL 2026 (MI vs DC) : दिल्लीचा सलग दुसरा विजय; मुंबईवर ६ विकेटने मात…

IPL 2026 (MI vs DC) | दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सहा विकेटने धुव्वा उडवला. अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी (दि. ४) झालेल्या या सामन्यात प्रथम दिल्लीने मुंबईला ६ बाद १६२ धावांवर रोखले. मुकेशकुमारने दोन तर लुंगी एन्गिडी, अक्षर पटेल, विपराज निगम आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात, दिल्लीने १८.१ षटकांत ४ बाद १६४ धावा करीत सामना जिंकला.

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून एकूण १६२ धावा उभारल्या. दिल्लीने १८.१ षटकांत १६३ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले; हे करताना त्यांनी ४ गडी गमावले. इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवीने ५१ चेंडूंत ७ षटकार आणि ७ चौकारांसह ९० धावा फटकावत ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला. सलामीला आलेला श्रीलंकेचा अष्टपैलू पथुम निशांकाने ३० चेंडूंत १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या.

तत्पूर्वी, हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या सुर्यकुमार यादवच्या ५१ धावा (३६ चेंडूंत २ षटकार, ३ चौकार) आणि रोहित शर्माच्या ३५ धावांच्या (२६ चेंडूंत १ षटकार, ५ चौकार) जोरावर मुंबईने दीडशेपार मजला मारली.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune | रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, पैशांच्या वादातून पुण्यात स्मशान काली मंदिरापाशी रक्तरंजित थरार...

Next Post

IPL 2026(RR vs GT) : तुषारच्या हुशार गोलंदाजीमुळे राजस्थानची गुजरातवर मात....