IPL 2026, LSG vs DC Highlights : लुंगी एनगिडी आणि टी नटराजन यांच्या भेदक गोलंदाजीनंतर, समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला सहा गडी राखून पराभूत करत आयपीएल २०२६ मधील आपला पहिला विजय नोंदवला.
बुधवारी एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनौने १८.४ षटकांत १० गडी गमावून १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने १७.१ षटकांत ४ गडी गमावून १४५ धावा केल्या आणि सामना जिंकला. रिझवी चार षटकार आणि पाच चौकारांसह ४७ चेंडूंमध्ये ७० धावांवर नाबाद राहिला, तर स्टब्स ३९ धावांवर नाबाद राहिला. विरोधी संघाकडून प्रिन्स यादवने २० धावांत दोन बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ संघाने २० षटकांत १० गडी गमावून १४१ धावा केल्या. त्यांच्याकडून अब्दुल समदने सर्वाधिक ३६ धावा केल्या. दरम्यान, दिल्लीकडून लुंगी एनगिडी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर कुलदीप यादवने दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक बळी घेतला.


