Advertisement

IPL 2026 | थयथयाट भोवला; हैदराबादचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्माला मॅच फीच्या २५ टक्के दंड…

केकेआरविरुद्धच्या सामन्यात ४८ धावांवर झेलबाद झाल्यावर तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना उच्चारले अर्वाच्च शब्द

कोलकाता : आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध मोठा विजय मिळवला असतानाच या संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याला मात्र दंडाला सामोरे जावे लागले. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना अर्वाच्च शब्द उच्चारल्याने त्याच्यावर मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

ईडन गार्डन्सवर गुरुवारी (दि. २) रात्री उशिरा झालेल्या या सामन्यात अभिषेकने आक्रमक ४८ धावा केल्या. मात्र, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाल्यानंतर पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्याने अर्वाच्च शब्द उच्चारले. अभिषेकला आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.३ च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. हे कलम सामन्यादरम्यान ‘अयोग्य वर्तन’ किंवा खेळाच्या भावनेच्या विरुद्ध टिप्पण्या किंवा इशाऱ्यांशी संबंधित असते.

अभिषेकवर जी कारवाई करण्यात आली, अद्याप त्या घटनेचा सामना रेफरीने अद्याप खुलासा केलेला नाही.  असे मानले जात आहे की अभिषेक शर्माने कॅच आऊट झाल्यावर तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

नेमके काय घडले?

नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर अभिषेक बाद झाला. ब्लेसिंग मुजरबानीने टाकलेल्या स्लोअर वनवर फटका खेळताना त्याचे टायमिंग चुकले. ११२ किलोमीटर प्रति तास वेगाच्या या शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूवर अभिषेकने पुल शॉट खेळला. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. सीमारेषेवर उपस्थित वरुण चक्रवर्ती वेगाने आपल्या उजवीकडे धावला, खाली वाकून शानदार डाइव्ह मारली आणि कॅच पकडला. मात्र, रिप्लेमध्ये झेल पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हता, परंतु तिसऱ्या पंचांनी वेगवेगळ्या कोनांतून तपासणी केल्यानंतर अभिषेकला बाद घोषित केले.

तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे असमाधानी असलेला अभिषेक रागाने मैदानाबाहेर जाताना दिसला. अभिषेक आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. २१ चेंडूंत ४ षटकार आणि ४ चौकारांसह ४८ धावा फटकावत तो बाद झाला,

अभिषेकला चूक मान्य

अभिषेकने आपली चूक मान्य केली आहे. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, त्याने लेव्हल वनच्या गुन्ह्याखाली मॅच रेफरीने दिलेली शिक्षा स्वीकारली आहे.
आयपीएलच्या नियमांनुसार, लेव्हल वनच्या उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये सामना रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. यात खेळाडूकडे अपील करण्याचा पर्याय नसतो. अभिषेकने आपली चूक मान्य केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही.

एक डिमेरिट पॉइंटही मिळाला, निलंबनाचा धोका

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध अभिषेकने आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केले,. यामुळे त्याला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला. यासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला आहे. अभिषेकच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा झाल्यामुळे, त्याला आता पुढील सामन्यांमध्ये सावध राहावे लागेल. आयपीएलच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने ठराविक वेळेत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट जमा केले, तर त्याच्यावर एक किंवा अधिक सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune News : पुण्यात पावसाळी लाइन केवळ १६ टक्के जाळे; पाणी साचण्याची समस्या तीव्र : प्रत्येक अतिवृष्टीत पुणेकरांना होतोय त्रास

Next Post
Pune MIT Gurukul School

Pune MIT Gurukul School : शाळेची फी नव्हे, हा तर दरोडा; कोथरूडमधील एमआयटी विश्वशांती गुरुकुलविरोधात संतप्त पालकांचा आक्रोश