IPL 2025 (SRH Vs LSG Toss & Playing 11 Update)
IPL 2025 (SRH Vs LSG Toss & Playing 11 Update) : आयपीएल २०२५ चा कारवां जसजसा पुढे सरकत आहे तसतसा स्पर्धेचा उत्साहही वाढत आहे. आयपीएल २०२५ चा सातवा सामना आज( २७ मार्च) सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला जाईल. एकीकडे, हैदराबादने आपला पहिला सामना जिंकला आहे, तर लखनौने स्पर्धेची सुरुवात पराभवाने केली आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि एसआरएच यांच्यातील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. तत्पूर्वी, लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, शाहबाज अहमद या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी आवेश खानला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, त्यांचा संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरेल.
🚨 Toss 🚨@LucknowIPL won the toss and elected to bowl against @SunRisers in Hyderabad.
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
Updates ▶ https://t.co/X6vyVEvxwz#TATAIPL | #SRHvLSG pic.twitter.com/9PJ6Oo6YFR
SRH vs LSG : दोन्ही संघाचे प्लेइंग 11 खालीलप्रमाणे...
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी. (प्रभावी खेळाडू: सचिन बेबी, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, अॅडम झांपा, वियान मुल्डर.)
लखनौ सुपर जायंट्स : एडेन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव. (प्रभावी खेळाडू: शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, मिशेल मार्श, हिम्मत सिंग, आकाश महाराज सिंग.)
दरम्यान, जर आपण दोन्ही संघांच्या हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोललो तर लखनौचा संघ खूप पुढे असल्याचे दिसते. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांनी आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये SRH ने १ आणि LSG ने ३ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एकही सामना निकालाशिवाय राहिलेला नाही.