IPL 2025 (RR vs KKR, Toss & Playing 11 Update )
IPL 2025 (RR vs KKR, Macth 06 Toss & Playing 11 Update ) : आज आयपीएल २०२५ चा सहावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ त्यांचा पहिला सामना गमावल्यानंतर परत मैदानात उतरणार आहेत. आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात आरसीबीने केकेआरचा पराभव केला आणि आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात एसआरएचने आरआरचा पराभव केला. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, सुनील नारायण या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी मोईन अलीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, राजस्थानचा कर्णधार रियान परागने सांगितले की, त्याच्या संघातही बदल झाला आहे. फजलहक फारुकी यांच्या जागी वानिंदू हसरंगा खेळताना दिसेल.
🚨 Toss 🚨@KKRiders elected to bowl first against @rajasthanroyals in Guwahati
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
Updates ▶ https://t.co/lGpYvw87IR #TATAIPL | #RRvKKR pic.twitter.com/PVVVJoU2cz
दोन्ही संघाचं Playing 11 खालीलप्रमाणे....
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिन्दु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिष थीकशन, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.
प्रभावी खेळाडू: कुणाल सिंग राठोड, शुभम दुबे, आकाश माधवाल, कुमार कार्तिकेय, क्वीन म्फाका.
कोलकाता नाईट रायडर्स : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
प्रभावशाली खेळाडू : अँरिच नोर्टजे, मनीष पांडे, अंगकृष रघुवंशी, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया.
DC vs LSG : पहिल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतकडून लखनौला खूप अपेक्षा होत्या. पण तो अपयशी ठरला. आयपीएल २०२५ च्या लिलावात २७ कोटींना पंतला खरेदी करण्यात आलं होतं. #IPL2025 #DCvLSG
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) March 25, 2025
सविस्तर बातमीसाठी 👇 👇खालील लिंकवर क्लिक करा… pic.twitter.com/4UgZHVATad
दोन्ही संघाचं हेड-टू-हेड रिकॉर्ड...
सर्वप्रथम, केकेआर आणि आरआर किती वेळा भिडले आहेत आणि कोणी किती वेळा जिंकले आहे ते पाहूया. जर आपण आकडेवारी पाहिली तर कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत एकूण ३० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी केकेआर १४ वेळा विजेता ठरला आहे, तर आरआरने १४ सामने जिंकले आहेत. २ सामन्यांमध्ये निकाल लागला नाही.
जर आपण या सामन्यांमधील दोन्ही संघांच्या सर्वोच्च धावसंख्येवर नजर टाकली तर कोलकाताची सर्वोच्च धावसंख्या २२३ तर राजस्थानची सर्वोच्च धावसंख्या २२४ आहे. जर आपण सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोललो तर केकेआरची कमी धावसंख्या १२५ आणि आरआरचा कमी धावसंख्या ८१ आहे.