७.३०
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad (Toss & Playing 11 Update) | आयपीएल २०२५ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना आहे. दोन्ही संघ वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता आमनेसामने येतील. या हंगामातील हा ३३ वा सामना असेल. आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाने सहा सामने खेळले आहेत. या काळात त्यांना चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ पॉइंट टेबलमध्ये ९ व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच तळापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमआयबद्दल बोलायचे झाले तर ते पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्याच्या संघाला सहा पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागणार आहे. या सामन्यासाठी मुंबई आणि सनरायझर्स हैदराबादनं प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
🚨 Toss 🚨@mipaltan elected to field against @SunRisers
Updates ▶️ https://t.co/8baZ67XxKu #TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/uBcAYXn87a
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
दोन्ही संघांचे Playing 11 खालीलप्रमाणे…
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी, इशान मलिंगा.(Impact Player:अभिनव मनोहर, जयदेव उनाडकट, सचिन बेबी, राहुल चहर, विआन मुल्डर.)
मुंबई इंडियन्स : रायन रिक्लेटन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, करण शर्मा. (Impact Player:रोहित शर्मा, कोबिन बॉश, अश्विनी कुमार, राज बावा, रॉबिन मिंज.)
हेड टू हेड रेकाॅर्ड…
मुंबई आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने १३ सामने जिंकले आहेत तर हैदराबादने १० सामने जिंकले आहेत. एसआरएच विरुद्ध एमआयची सर्वोच्च धावसंख्या २४६ अशी आहे तर एसआरएचची एमआय विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या २७७ अशी आहे.
IPL 2025 : बीसीसीआयने मुनाफ पटेलला ठोठावला मोठा दंड..! जाणून घ्या, दिल्लीच्या प्रशिक्षकावर का झाली कारवाई, व्हिडीओही आला समोर….#IPL2025 #BCCI #MunafPatel #DCvRR
आयपीएल २०२५ मध्ये बुधवारी एक रोमांचक सामना झाला जिथे यजमान दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव… pic.twitter.com/wI2tk3Lt0m— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) April 17, 2025
IPL 2025 Live Streaming : कुठे आणि कसं पाहाल?
आयपीएल 2025 चे थेट प्रक्षेपण टीव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असणार आहे. टीव्ही ब्रॉडकास्ट वर सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील तर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार (JioHotstar) अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल. महत्त्वाचं म्हणजे, यंदा जिओहॉटस्टारवर आयपीएल पाहण्यासाठी प्रेक्षकांना पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. म्हणजेच, आयपीएल 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग पूर्णपणे मोफत नसेल.


