GT vs PBKS Toss & Playing 11 Update,
GT vs PBKS (Toss & Playing 11 Update) | आज आयपीएल २०२५ चा पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. यावेळी पंजाब नवीन कर्णधार श्रेयस अय्यरसह आला आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आहे. आयपीएल २०२५ मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना असेल, त्यामुळे दोघेही त्यांच्या मोहिमेची सुरुवात विजयाने करू इच्छितात.
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २०२२ च्या विजेत्या संघाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, या सामन्यात त्याच्या प्लेइंग ११ मध्ये चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, पहिल्यांदाच पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने सांगितले की, त्याच्या प्लेइंग ११ मध्ये एक फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss 🚨@gujarat_titans have won the toss and opted to bowl first against @PunjabKingsIPL.
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2025
Updates ▶️ https://t.co/PYWUriwSzY#TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/7GUAOWuOeR
GT vs PBKS : दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे...
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अझमतुल्ला उमरझाई, मार्को जानसेन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
दरम्यान, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी गुजरातने तीन वेळा विजय मिळवला आहे, तर पंजाबने दोन सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, गुजरातचा संघ वरचढ असल्याचे दिसते. आयपीएल २०२५ मधील दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाईल. हे गुजरात टायटन्सचे होम ग्राउंड आहे, जिथे संघाने नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे.
गुजरातने जिंकले आहे एकदा विजेतेपद ...
साल २०२२ मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. दुसरीकडे, पंजाब किंग्ज संघाला आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही, जरी ते २००८ पासून या स्पर्धेचा भाग आहे. पंजाब किंग्ज २०१४ च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु नंतर कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंग केले.
आयपीएल २०२५ लाईव्ह स्ट्रीमिंग : कुठे आणि कसं पाहाल?
आयपीएल २०२५ चे थेट प्रक्षेपण टीव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असणार आहे. टीव्ही ब्रॉडकास्ट वर सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील तर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार (JioHotstar) अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल. महत्त्वाचं म्हणजे, यंदा जिओहॉटस्टारवर आयपीएल पाहण्यासाठी प्रेक्षकांना पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. म्हणजेच, आयपीएल २०२५ चे लाईव्ह स्ट्रीमिंग पूर्णपणे मोफत नसेल.