IPL 2025 & Rahul Dravid | 'पायाला प्लास्टर, चेहऱ्यावर निराशा...'; ‘द वॉल’ राहुल द्रविडचे व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल, नेटकरी हळहळले...

राहुल द्रविड व्हिलचेअर आणि कुबड्यांच्या आधारे संघाचे सराव सत्र, सामने, टीम मिंटिंग्स याला उपस्थित असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 27 Mar 2025
  • 03:32 pm
IPL 2025 news, Sport news, Cricket news,

Rahul Dravid's photo in wheelchair goes viral,

Rahul Dravid Wheelchair Photo Viral : राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली राजस्थान रॉयल्सची आयपीएल २०२५ मध्ये खराब सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन सामन्यात दोन पराभवांसह, आरआर -१.८८२ च्या निव्वळ धावगतीसह पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. 

आयपीएल २०२५ च्या आधी, एका क्लब चॅरिटी सामन्यात खेळताना द्रविडला पायाला दुखापत झाली आणि तो डाव्या पायावर  प्लास्टर बांधून आरआर कॅम्पमध्ये पोहोचला. हा अनुभवी खेळाडू सध्या आधाराशिवाय चालू शकत नाही आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पराभवानंतर तो व्हीलचेअरवर मैदानावर फिरताना दिसला. 

क्विंटन डि-कॉकच्या ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने हा विजय सहज नोंदवला. त्याच्या या खेळीचं कौतुक करण्यासाठी राहुल द्रविड कुबड्यांच्या आधारे मैदानावर पोहोचले आणि त्याला हात मिळवत शाबासकी दिली आणि त्यानंतर हेच द्रविडचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण दुःख व्यक्त करत आहेत तर काहीजण द्रविडचे कौतूक करत आहेत.

आयपीएल २०२५ च्या आधी, आरआरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, "मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना जखमी झाले. ते सध्या पुनर्वसन प्रक्रियेत आहे आणि लवकरच जयपूरमध्ये आमच्यासोबत जोडले जातील."

यानंतर, त्याचा पहिला समोर फोटो आला ज्यामध्ये द्रवि़ड हे कुबड्यांच्या मदतीने चालत होते आणि आता  व्हिलचेअरवरील फोटोही समोर आले आहेत.  हे फोटो व्हायरल होताच ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामसह अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर चाहत्यांनी द्रविडप्रती आपली सहानुभूती व्यक्त केली आहे.  चाहते त्याच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.   “द वॉल अजूनही लढतोय”, “द्रविडसारखा योद्धा कधी हार मानत नाही”, "कोच असावा तर असा " अशा कमेंट्सनी सोशल मीडियावर ओघ वाढला आहे.

राहुल द्रविड व्हिलचेअर आणि कुबड्यांच्या आधारे संघाचे सराव सत्र, सामने, टीम मिंटिंग्स याला उपस्थित असतात.

दरम्यान, द्रविड हा राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार आहे आणि त्याने २०११ ते २०१५ पर्यंत फ्रँचायझीसोबत पाच हंगाम घालवले. त्याने २०१४ मध्ये रॉयल्ससोबत त्याच्या कोचिंग कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला आहे.

Share this story

Latest