IND vs BAN 2025 Schedule...
IND vs BAN 2025 Schedule : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यानंतर, ऑगस्टमध्ये भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
एकदिवसीय आणि टी20 मालिका कधी सुरू होईल?
बांगलादेशविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 17 ऑगस्टपासून सुरू होईल. दुसरा सामना 20 ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळला जाईल. या मालिकेतील सुरुवातीचे सामने मीरपूरमध्ये खेळवले जातील. तर, तिसरा सामना 23 ऑगस्ट रोजी चितगाव येथे खेळला जाईल. यानंतर, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. पहिला सामना 26 ऑगस्ट रोजी खेळला जाईल, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 29 आणि 31 ऑगस्ट रोजी होईल.
दोन्ही संघांमधील संपूर्ण वेळापत्रक...
पहिला एकदिवसीय सामना – 17 ऑगस्ट (मिरपूर)
दुसरा एकदिवसीय सामना – 20 ऑगस्ट (मिरपूर)
तिसरा एकदिवसीय सामना - 23 ऑगस्ट (चितगाव)
पहिला टी20 सामना - 26 ऑगस्ट (चितगाव)
दुसरा टी20 सामना - 29 ऑगस्ट (मिरपूर)
तिसरा टी20 सामना - 31 ऑगस्ट (मिरपूर)
गेल्या वेळी टीम इंडियाने गमावली होती वनडे मालिका...
भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशमध्ये 2022/23 मध्ये शेवटची एकदिवसीय मालिका खेळली होती, तेव्हा बांगलादेशने भारताविरुद्ध 2-1 अशी मालिका जिंकली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावले होते. टी-20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही मालिका जिंकल्या आहेत.
सध्या सर्व भारतीय खेळाडू आयपीएल 2025 मध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. या लीगनंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडला रवाना होईल, जिथे 20 जूनपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.
भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर...
बांगलादेश दौऱ्याआधी, भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा दौरा करेल. या काळात दोन्ही संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. ही मालिका 20 जूनपासून सुरू होईल. पहिला सामना लीड्समध्ये खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल तर तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्स येथे सुरू होईल. तर चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे 23 आणि 31 जुलै रोजी मँचेस्टर आणि ओव्हल येथे खेळला जाईल.