संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडहून भारतात परतले आहेत. कौटुंबिक इमर्जन्सीमुळे त्यांना तातडीने भारतात परतावे लागले. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. संघाला तिथे पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. गंभीर ६ जून रोजी उर्वरित संघासह इंग्लंडला रवाना झालले होते.
उभय संघांत पहिला कसोटी सामना २० जून रोजी लीड्स येथे खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जातील. पहिली कसोटी २० जूनपासून लीड्समध्ये सुरू होईल, तर शेवटची कसोटी ३१ जुलैपासून लंडनमधील ओव्हल येथे खेळली जाईल. २००७ पासून भारताने इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत, संघ मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करेल.
इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यांचा भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, ऋषभ पंत (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंह, कृष्णा प्रदीप सिंह, कुलदीप यादव.
विजेत्याला मिळणार तेंडुलकर-ॲंडरसन ट्राॅफी
यावेळी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला एक नवीन ट्रॉफी दिली जाईल. सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावरून तिला तेंडुलकर-ॲंडरसन ट्राॅफी असे नाव देण्यात आले आहे. दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या सन्मानार्थ हा एक नवीन उपक्रम आहे.