संग्रहित छायाचित्र
भारतीय हॉकी संघाने अर्जेंटिनाला बरोबरीत रोखल्यानंतर आयर्लंडला २-० ने हरवून पदकाच्या आशा कायम राखल्या आहेत. मंगळवारी झालेल्या या सामन्यात भारतातर्फे दोन्ही गोल अनुभवी खेळाडू हरमनप्रीत सिंग यानेच केले. अर्जेंटिनाविरुद्धदेखील त्याचे गोल करून भारताचा पराभव वाचवला होता.
‘ब’ गटामध्ये झालेल्या या एकतर्फी सामन्यात आयर्लंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना १ ऑगस्टला बेल्जियमविरुद्ध होणार आहे.