IND W vs IRE W : टीम इंडियानं पहिल्याच सामन्यात आयर्लंडचा 6 विकेट्सने उडवला धुव्वा, प्रतिका-तेजलची दमदार कामगिरी....

महिला क्रिकेटमध्ये भारताने शानदार कामगिरी केली आहे. राजकोट एकदिवसीय सामन्यात त्यांनी आयर्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. प्रतिका आणि तेजल यांनी टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 11 Jan 2025
  • 10:21 am
IND W vs IRE W 1st ODI ,

IND W vs IRE W 1st ODI ...

India Women vs Ireland Women 1st ODI : महिला क्रिकेट संघाने राजकोटमध्ये दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. भारताने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 50 षटकात 7 बाद 238 धावा करत 239 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने 34.3 षटकांत लक्ष्य गाठले. भारतासाठी प्रतिका रावल आणि तेजल यांनी दमदार कामगिरी केली. दोघींनीही अर्धशतके ठोकली. टीम इंडियाने हा सामना स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली. संघाने 27 धावांवर पहिली विकेट गमावली. सारा फोर्ब्स फक्त 9 धावा करून बाद झाली. यानंतर, उना रेमंड 5 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. ओर्लाही 9 धावा करून माघारी परतली. पण कर्णधार गॅबी लुईसने संघाचा डाव सावरला. तिने 129 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. तिला ली पॉलने चांगली साथ दिली. ली पॉलने 73 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या.

टीम इंडियाने फक्त 34.3 षटकांत गाठलं लक्ष्य...

आयर्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 34.3 षटकांत 4 बाद 241 धावा करत सामना जिंकला. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार मंधाना आणि प्रतीका यांच्यात एक मजबूत भागीदारी झाली. मंधानाने 29 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 41 धावा केल्या. तर प्रतीकाने 10 चौकार आणि 1 षटकारासह 96 चेंडूत 89 धावा केल्या. त्यानंतर तेजल हसबनीस पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिने नाबाद अर्धशतक झळकावले. तेजलनं 46 चेंडूत 9 चौकारांसह 53 धावांची खेळी केली तर रिचा घोष 08 धावांवर नाबाद राहिली.

भारताकडून प्रिया मिश्राने शानदार केली गोलंदाजी...

भारताकडून प्रियाने शानदार गोलंदाजी केली. तिने 9 षटकांत 56 धावा देत 2 बळी घेतले. यासोबतच तिने 1 मेडन ओव्हरही टाकली. तितस साधू आणि सायली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दीप्ती शर्मालाही 1 यश मिळाले.

Share this story

Latest