Live Cricket Score Today IND vs WI Test 2025 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने हे दोन्ही कसोटी भारतासाठी महत्त्वाचे आहेत.
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. भारताकडून केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार कामगिरी केली. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचे खेळाडू पहिल्या दिवशी अपयशी ठरले. त्यांच्या एकाही खेळाडूला दमदार कामगिरी करता आली नाही. पहिल्या दिवशी पूर्णपणे भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद १६२ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडीजला १६२ धावांवर गारद केल्यानंतर भारतानं पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी पहिल्या विकेट साठी ६८ धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वाल ३६ धावा करुन बाद झाला तर साई सुदर्शन मोठी कामगिरी करु शकला नाही. तो १९ चेंडूंचा सामना करून फक्त ०७ धावा करून बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा केएल राहुल ५३ धावांवर तर कर्णधार शुभमन गिल नाबाद १८ धावांवर माघारी परतला. भारत आघाडी घेण्यापासून अजूनही ४२ धावा दूर आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक ३२ धावा केल्या. संघ साडेचार तासांपेक्षा कमी वेळात सर्वबाद झाला. भारताकडून गोलंदाजीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार तर जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीप यादवने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.


