,IND vs ENG T20I Series 2025
India vs England T20I Series 2025 Live Streaming : ऑस्ट्रेलियन भूमीवरील लज्जास्पद पराभव विसरून, टीम इंडिया क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तरुण स्टार खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ कागदावर खूपच मजबूत दिसतो आहे. यापूर्वी, संघाने घरच्या मैदानावर झालेल्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
फलंदाजीत संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांची बॅट जोरात बोलत आहेत. कॅप्टन सूर्या स्वतः चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र, सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीच्या कामगिरीवर असतील. ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्याचा आनंद तुम्ही कसा घेऊ शकता ते जाणून घेऊया.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आज (२२ जानेवारी) खेळला जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना कुठे खेळला जाईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. नाणेफेक (टॉस) अर्धा तास आधी केली जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकता?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
Eden for Game One!🇮🇳💪#WhistlePodu #INDvENG pic.twitter.com/dpgUb7AhGz
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) January 22, 2025
असे आहे मालिकेचे वेळापत्रक...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका आजपासून (22 जानेवारी) सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एम चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. राजकोटमध्ये तिसरा सामना 28 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. मालिकेतील चौथा सामना 31 जानेवारी रोजी पुण्यात खेळला जाईल, तर शेवटचा सामना 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. टी-20 मालिका संपल्यानंतर, 6 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल.