IND vs ENG 1st T20 weather updates
IND vs ENG 1st T20 weather update | भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता कोलकाता येथे खेळला जाईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे सोपवण्यात आले आहे. इंग्लंडने पहिल्या टी-20 साठी त्यांचे प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. तथापि, पहिल्या सामन्यात हवामान कसे असेल? हवामान खात्याचे ताजे अपडेट काय याबदल जाणून घेऊया.....
हवामान कसे असेल?
हा सामना ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. AccuWeather च्या अहवालानुसार, आज (22 जानेवारी) कोलकातामध्ये पावसाची शक्यता 0 टक्के आहे. वारा ताशी 6 किलोमीटर वेगाने वाहेल. आर्द्रता 57 टक्के राहील. अशा परिस्थितीत, सामन्यादरम्यान हवामानाचा अथवा पावसाचा कोणताही अडथळा येणार नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वेळी भारतीय भूमीवर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा टीम इंडियाने ती मालिका 3-2 अशी जिंकली होती. पण यावेळी इंग्लंड पूर्ण तयारीसह भारत दौऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासमोर इंग्लंडचे कठीण आव्हान असणार आहे.
खेळपट्टी अहवालावर एक नजर...
कोलकात्याची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत करतो. पण एकदा चेंडू जुना झाला की, फलंदाज सर्व दिशेने सहज धावा काढू शकतात. फिरकी गोलंदाजांचा चेंडूही फारसा फिरत नाही. या बाबतीत, फिरकी गोलंदाजांनाही या मैदानावर फारशी मदत मिळत नाही. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल. कारण हिवाळा असल्याने दुसऱ्या डावात दवाचा परिणाम दिसून येतो. अशा परिस्थितीत, नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला स्विंग मिळणार नाही.
IND vs ENG : आजपासून टी-20 मालिकेचा थरार..! जाणून घ्या; कधी, कुठे अन् कसा पाहू शकता पहिला सामना? यासह सर्व डिटेल्स एका Clickवर… #INDvsENG #INDvENG https://t.co/zvyNv90wT2
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) January 22, 2025
इंग्लंडविरुद्ध भारताची संभाव्य Playing 11 | संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल साल्ट, मार्क वूड.