IND vs ENG 1st T20 Playing 11 Update....
IND vs ENG 1st T20 Playing 11 Update | भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा 14 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर असतील.
तत्पूर्वी, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने टाॅस जिंकला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
IND vs ENG 1st T20 Match | इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं Toss जिंकला, कर्णधार सूर्यानं घेतला 'हा' निर्णय....#INDvENG #ENGvINDhttps://t.co/kgyItDjYwm
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) January 22, 2025
शमी Playing 11 मधून बाहेर
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यावेळी म्हणाला की, दव लक्षात घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाईल असे मानले जात होते, परंतु या सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही, त्यामुळे भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे.
IND vs ENG Live: दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे...
भारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड : बेन डकेत, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हैरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जैकब बेथेल, जैमी ओवरटन, गस एटकिंसन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड.
A look at our Playing XI 🔽
— BCCI (@BCCI) January 22, 2025
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NHhYbQmNgf
दोन्ही संघांकडे या फॉरमॅटमधील अनेक तगडे खेळाडू आहेत. यामुळेच कोलकातामध्ये बॅट आणि बॉलमध्ये म्हणजेच दोन्ही संघात तीव्र लढाई पाहायला मिळू शकते. कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदान अनेक ऐतिहासिक विजयांचे साक्षीदार बनले आहे आणि हे मैदान टी-20 मध्ये भारतासाठी लकी असे मैदान आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सहा जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे.
विशेष म्हणजे, या मैदानावर भारताचा एकमेव टी-20 पराभव इंग्लंडकडून झाला आहे. 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला आता इंग्लंडला हरवण्याची संधी असेल.